एक्स्प्लोर

Buldhana Hair Loss : बुलढाण्यातील तीन गावांमध्ये अजब आजार, तीन दिवसात केस गायब, गावकरी हैराण, नेमकं कारण काय?

Buldhana Hair Loss : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील असलेल्या पूर्णा नदीकाठावरील गावातील नागरिकांना अचानक केस गळतीच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास होत आहे. अचानक तीन दिवसातच टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांना अचानक डोक्यात खाजवणे आणि नंतर केस गळती आणि तीन दिवसातच टक्कल पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.  याबाबत आरोग्य प्रशासनाचे अधिकारी डॉ. अनिल बनकर यांच्याशी संवाद साधला. 

आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात आलंय की केस गळतीचे प्रकार आढळल्यास तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.  अशुद्ध पाणी अंघोळीसाठी वापरु नये, गरम पाण्याचा वापर करावा, असं डॉ. अनिल बनकर म्हणाले.  

प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत बोंडगाव, काठोरा आणि कालवड या गावात केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत. बोंडगाव येथे 16, काठोरा 13 आणि कालवड येथे 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत. या गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं आहे.  आरोग्य विभागाचे वैदकीय अधिकारी, समुदाय  आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक आणि आशा यांच्या पथकानं सर्वेक्षण केलेलं आहे. 

 या तीन गावातील पाणी तपासणीसाठी शेगाव येथे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना प्राथमिक सूचना देण्यात आल्या आहेत. काही समस्या जाणवल्यास त्वरीत संपर्क साधावा. पुढील कारवाई नक्कीच करु असं डॉ. अनिल बनकर यांनी म्हटलं आहे. 

अशुद्ध पाण्याच्या वापरामुळं किंवा नव्या कॉस्मेटिक्सचा वापर केल्यामुळं हा त्रास झाला असावा. एकूण 36 रुग्णांना हा त्रास आहे. ही संख्या वाढत आहे. केस गळतीची समस्या जाणवल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राकडे संपर्क साधावा. अद्याप याचं अचूक निदान झालेलं नाही. नागरिकांनी अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

ज्या नागरिकांची केस गळती झाली त्यांना देखील हे नेमकं कशामुळं झालं हे सांगता आलं नाही. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून असे प्रकार सुरु झाल्यानं नागरिकांमध्ये घबराट आहे. आरोग्य विभाग याबाबत नेमकी काय पावलं उचलणार हे देखील पाहावं लागेल. 

इतर बातम्या :

बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!

Buldhana Crime: धक्कादायक! बुलढाण्यात 52 वर्षीय वसतीगृह अधीक्षकाचा 12 वर्षाच्या मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

​Buldhana Gas Shortage : गॅसटंचाईची झळ गोरगरिबांच्या पार्ले-जी बिस्किटला; 4 दिवसांपासून उत्पादन बंद, 500 कामगारांवर टांगती तलवार
गॅसटंचाईची झळ गोरगरिबांच्या पार्ले-जी बिस्किटला; 4 दिवसांपासून उत्पादन बंद, 500 कामगारांवर टांगती तलवार
Buldhana Crime : सलग तीन वर्ष अवैधरित्या उत्खनन, महसूल विभागाकडून 30 कोटींचा दंड; भाजप आमदाराच्या आक्रमक पावित्र्यानंतर पुण्याच्या नामांकित कंपनीवर गुन्हा दाखल
बुलढाण्यात सलग तीन वर्ष अवैधरित्या उत्खनन, महसूल विभागाकडून 30 कोटींचा दंड; भाजप आमदाराच्या आक्रमक पावित्र्यानंतर पुण्याच्या कंपनीवर गुन्हा दाखल
Buldhana Crime News: बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
सूर्य कोपला! विदर्भात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सूर्य कोपला! विदर्भात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget