Buldhana Crime: धक्कादायक! बुलढाण्यात 52 वर्षीय वसतीगृह अधीक्षकाचा 12 वर्षाच्या मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार
चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहातील प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Buldhana Crime: आळंदीच्या शैक्षणिक संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाने 12 वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर असाच प्रकार बुलढाण्यातही घडलाय. वस्तीगृहाच्या 52 वर्षीय अधिक्षकाने 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault)केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या वसतीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वस्तीगृहात सातवीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलावर याच वस्तीगृहाचे अधीक्षक विनायक देशमुख या 52 वर्ष नराधमाने गेल्या दोन महिन्यापासून वारंवार लैंगिक अत्याचार केले. इतकंच नाही तर मुलाने आपल्या आईला फोनवरून माहिती दिली म्हणून या अधीक्षकाने या अल्पवयीन मुलावर जबर मारहाण केली आहे. या विद्यार्थ्याच्या आईने अमडापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम विनायक देशमुख यांच्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक केली आहे. (Buldhana Crime)
नराधमाने अनेकांसोबत अत्याचार केल्याचा संशय
चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर वस्तीग्रह आहे. हे वसतिगृह शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येत. मात्र याच वस्तीगृहात विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे दिसून आलं आहे. अशाच प्रकारचा अत्याचार या नराधम अधीक्षकाने इतर अनेक मुलांवर केल्याचे बोलले जात आहे. यावर पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र ज्यावेळी "एबीपी माझा" या वस्तीगृहावर पोहोचला त्यावेळी वस्तीगृहातील विद्यार्थी वाऱ्यावर होते. वस्तीगृहात कुणीही सुरक्षारक्षक नव्हते . त्यामुळे आता शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या झालेल्या प्रकारामुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे.
अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार
पाहूणा म्हणून आलेल्या 28 वर्षीय तरुणाने आळंदीतील शैक्षणिक संस्थेत 12 वर्षांच्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून आळंदीसह संपूर्ण परिसर हादरलाय. (Sexual Assault) पुण्यातील आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला असलेल्या एका शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडला असून या प्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे. पुण्यातील आळदीत एका संस्थेत पाहूणा म्हणून आलेल्या 28 वर्षीय तरुणानं वासनेची शिकार बनवत दोन 12 वर्षांच्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आल्यानं परिसर हादरलाय. (Maharashtra Crime News)
हेही वाचा: