ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यातील ST कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईना; महामंडळाकडून 4 महिन्यांपासून PF च जमा होईना, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला संताप, ॲड. गुणरत्न सदावर्तेंकडून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा https://tinyurl.com/mr3uca8p
2. ऑपरेशन टायगरची चर्चा, कोकणात धक्के; डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये; आमदार-खासदारांना मातोश्रीवर बोलावलं, पुढील आठवड्यात होणार बैठक https://tinyurl.com/yn9zfusk कोकणानंतर मुंबईत तेच घडलं, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा राजीनामा, वांद्रेतील उपशाखाप्रमुख जितेंद्र जानावळेनी उद्धव ठाकरेंना स्फोटक भावनांनी भरलेलं पत्र पाठवत केला 'जय महाराष्ट्र' https://tinyurl.com/zjp4ncr7
3. विधानसभा जिंकल्यानंतर भाजपची 'शत-प्रतिशत'ची तयारी; कोल्हापूरमधील कार्यक्रमातून महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत https://tinyurl.com/398zpt4z कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा तळकोकणातला शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला; विधानसभेतील पराभवानंतर वैभव नाईक पहिल्यांचा उद्धव ठाकरेंना भेटले https://tinyurl.com/4wyzy6uw
4. अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात; आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का? मी यापूर्वीच पुरावे दिले आहेत https://tinyurl.com/mr2jz59d धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, माध्यमांशी बोलणं टाळलं https://tinyurl.com/2v4csrrt
5. याचा अर्थ तू राजीनामा दे... अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अर्थ, म्हणाले, अजित पवार हतबल आणि हेल्पलेस झाले आहेत https://tinyurl.com/5ypzehtu अजित पवारांनीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यायला पाहिजे; मंत्री संजय शिरसाट यांची स्पष्ट भूमिका https://tinyurl.com/2n48btsw
6. महायुतीत श्रेयवादाची लढाई; अजितदादांनी भूमिपूजन केलेल्या नाशिकमधील भूगर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचं एकनाथ शिंदेंकडून पुन्हा भूमिपूजन होणार; https://tinyurl.com/yay9ww3f वाघांच्या कळपात या! राज्यात महिनाभरात मोठे बदल होतील, मंत्री संजय शिरसाटांचा दावा; भास्कर जाधवांना शिवसेनेतून जाहीर ऑफर https://tinyurl.com/4n6zsanm
7. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते जयंत पाटलांच्या संस्थेतील वसतीगृहाचं उद्घाटन, दोन विरोधी पक्षाचे लोक एकाच ठिकाणी येऊ शकत नाहीत का?, जयंत पाटलांचा सवाल; सांगलीतील कार्यकर्ते म्हणाले, आम्ही साहेबांसोबत https://tinyurl.com/k9vvywpt
8. नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं; व्हिडिओत म्हणाले, वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती वाढत चाललीय https://tinyurl.com/4s78kvnh कल्याण-डोंबिवलीतील 6500 रहिवासी बेघर होणार, दहा दिवसात घरे खाली करण्याची नोटीस, 48 इमारती पाडणार https://tinyurl.com/46n4n5v6
9. हीच आमची सर्वात मोठी कमाई, शंभूराजे घराघरात पोहोचवा; सिनेमागृहातील चिमुकल्याच्या गगनभेदी गारदने विकी कौशलच्या अंगावर शहारे https://tinyurl.com/mudkucnk महाराष्ट्रानं 'धाकल्या धन्यां'ना डोक्यावर घेतलं; छावाचं वादळ घोंगावलं, एकाच दिवसात 50 कोटी, तीन दिवसांत 121 कोटी कमाई https://tinyurl.com/4wdkzzpc
10. दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना https://tinyurl.com/mr27j5ck
*एबीपी माझा स्पेशल*
तुम्ही पाहिलं का हो हिला? दिल्लीतील चेंगराचेंगरीत हरवलेल्या पत्नीचा मोबाईलमधला फोटो दाखवत नवऱ्याची विचारणा; अख्खी रात्र मृतदेह पाहिले पण ती कुठेच नव्हती https://tinyurl.com/muhbeess
परदेशात जाण्याचा निर्णय बदलला, घरच्या शेतीतच यशाचा मार्ग गवसला; पंजाबच्या गुरुदासपूरमधील युवा शेतकरी गुळ उद्योगातून दररोज मिळवतोय 2 लाखांचा नफा https://tinyurl.com/bdeb4692
आमदार सुरेश धस-धनंजय मुंडेंची भेट 18-19 दिवसांपूर्वी, थोडं थांबा, गुपित बाहेर येईल; बजरंग सोनवणेंचा दावा
https://tinyurl.com/4kz4fdsa
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
