एक्स्प्लोर
Buldhana Lakdi Ganpati : बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 130 वर्षांपूर्वीची लाकडी गणपती मूर्ती; नवसाला पावणारा मानाचा गणपती अशी ओळख
Buldhana Lakdi Ganpati : बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील 130 वर्षांआधीची लाकडी गणपती मूर्ती आहे.

Buldhana Lakdi Ganpati News
1/8

नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या लाकडी गणपतीचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे.या मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा सुमारे 130 वर्षांपूर्वी झाली.
2/8

दर गणेश चतूर्थीपासून अनंत चर्तुदशीपर्यंत या मंदिरात दर्शनाची आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. हा लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित करण्याची 130 वर्षांपासूनची परंपरा आजही सुरू आहे.
3/8

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील 130 वर्षांआधीची ही लाकडी गणपती मूर्ती आहे.
4/8

खामगाव शहरामधून वाहणाऱ्या बोर्डी नदीमध्ये ही मूर्ती संपूर्ण लाकडाची असल्याने साधारण 130 वर्षांपूर्वी वाहत आली होती. त्यावेळी नागरिकांनी ती पकडून मूर्तीची स्थापना केली.
5/8

आज या मूर्तीला मानाचा गणपती म्हणून जिल्ह्यात ओळखलं जातं. गणेशोत्सवात या मूर्तीची स्थापना झाल्यानंतरच इतर मूर्तीची स्थापना केली जाते.
6/8

विसर्जन करताना सर्वात पुढे मानाचा गणपती असतो. 10 दिवस या मूर्तीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.
7/8

दहाव्या दिवशी मिरवणुकीनंतर या मूर्तीची पुन्हा मंदिरात स्थापना केली जाते. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती विसर्जित केली जात नाही. नवसाला पावणाऱ्या या लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी खामगावांत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगडवरून मोठया प्रमाणावर भाविक भक्त येतात.
8/8

शिव आणि पेशवेकाळात सुमारे 130 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात इतरत्र कुठे नसेल अशा आखीव आणि रेखीव लाकडी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
Published at : 13 Sep 2024 09:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
