Mahadev Munde: महादेव मुंडेंच्या तपासाच्या 3 मागण्यांसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंचे आजपासून उपाेषण, तिकडे अधिवेशनात होणार खडाजंगी
परळीतील महादेव मुंडे यांचा 16 महिन्यांपूर्वी परळी तहसील परिसरात खून झाला होता .

Mahadev Munde Case: महादेव मुंडे प्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे दाखल करावा . खूनाच्या कटात ज्यांनी फोन केले त्या आरोपींचे सीडीआर काढावेत .महादेव मुंडे यांच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या 3 प्रमुख मागण्यांसाठी आजपासून महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dyaneshwari Munde) आणि मुंडे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करणार आहेत . राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे .या अधिवेशनात विरोधक संतोष देशमुख प्रकरण तसेच महादेव मुंडे प्रकरणावरून आवाज उठवण्याची शक्यता आहे . (Protest)
सकाळी 9.30 वाजता ज्ञानेश्वरी मुंडे परळीहून बीडसाठी निघाल्या .साधारण 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्या उपोषणाला सुरुवात करतील .परळीतील महादेव मुंडे यांचा 16 महिन्यांपूर्वी परळी तहसील परिसरात खून झाला होता .16 महिने उलटून गेले तरीही या प्रकरणातील आरोपी फरार आहे .आरोपीला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही .या अटकेच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे उपोषण करणार आहेत .
महादेव मुंडेंचाच तपास करताना यंत्रणा कुठे जाते?
गेल्या अधिवेशनात जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा मांडला होता तरीही काहीच झालं नाही .आता या अधिवेशनात सुरेश धस यांनी महादेव मुंडे प्रकरणाचा मुद्दा मांडणार असल्याचं सांगितलंय .त्यामुळे आज उपोषणाला बसण्याचा निर्णय त्यामुळेच घेतला असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एबीपी माझाला सांगितलं .नवऱ्याच्या न्यायासाठी गेले 16 महिने लेकरा बाळांसह पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे .मग आम्हाला न्याय का भेटत नाही ?असा सवाल ही त्यांनी केला .स्वारगेट प्रकरणात यंत्रणा लावून एका दिवसात आरोपीला अटक होऊ शकते तर आमच्यावर ओढवलेला प्रसंगही पहा .घरातला कर्ता करविता गेला आहे .महादेव मुंडे यांच्या बाबतीतच यंत्रणा कुठे जाते असा सवाल ही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला .
पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी या खून प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय विशेष पथकाची नियुक्ती केली होती .मात्र एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही .ज्ञानेश्वरी मुंडे यांचा उपोषणाला मस्साजोग ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिलाय .
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
