एक्स्प्लोर
Sanjay Raut On Suresh Dhas: सुरेश धसांना त्यांच्या बॉसनेच ट्रॅपमध्ये पकडलं, खूप मोठ्ठी डील झालेय; संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut On Suresh Dhas: संजय राऊत यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य करत सुरेश धस यांच्यावर टीका केली.

Suresh Dhas
1/11

भाजपने शब्द पाळला असता आणि सरकार आलं असतं तर एकनाथ शिंदे यांनाच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री करण्याचे थेट सिग्नल दिला होता असा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
2/11

भाजपने शब्द पाळला नाही म्हणून युती सरकार आलं नाही आणि शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत असं संजय राऊत म्हणाले.
3/11

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिंदे उपस्थित होते, मात्र शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास अजित पवार, शरद पवारांनी विरोध केला होता याचा पुनरूच्चार संजय राऊतांनी केला.
4/11

संजय राऊत यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य करत सुरेश धस यांच्यावर टीका केली.
5/11

सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले,ज्या पद्धतीने आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले. सुरेश धस यांनी ज्याप्रमाणे काही कागद आणि पुरावे पुढे आणले.पण त्यानंतर अचानक ब्रेक लागला.
6/11

आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो, आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो, याचं भान सुरेश धस यांनी ठेवायला पाहिजे होतं, असं संजय राऊतांनी सांगितले.
7/11

एक मोठी डील झालेली आहे. धस ज्या वेगाने पुढे गेले त्याच वेगाने ब्रेक लागला. चंद्रशेखर बावनकुळे धसांचे बॉस,चंद्रशेखर बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
8/11

चंद्रशेखर बावनकुळे त्यांचे बॉस आहेत असे ते म्हणतात देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे बॉस आहेत, मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला.
9/11

आकाचे आका ज्याक्षणी तिकडे आले, तेव्हाच सुरेश धस यांनी बैठकीतून बाहेर पडायला हवं होतं. त्याला नैतिकता म्हणतात. आकाचे आका आल्यानंतर बैठकीतून बाहेर पडून माझ्याबाबतीत अशा पद्धतीने घात झाला आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला, असं बाहेर येऊन सांगायला हवं होतं, असं संजय राऊत म्हणाले.
10/11

आजवर आम्ही वाट पाहत होतो की ज्याप्रमाणे सुरेश धस आणि इतर नेते या प्रकरणावर ज्या पद्धतीने आवाज उचलत होते. संघर्ष करत होते, वाचा फोडत होते, मात्र हा सर्व घोटाळा आणि फसवणूक होत असल्याचं आम्हाला आता वाटू लागलं आहे. आता शिवसेनेला यात लक्ष घालण्याची वेळ आली आहे असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
11/11

काल खासदार सुप्रिया सुळे आणि इतर नेते बीडला जाऊन आले. मात्र आज खऱ्या अर्थाने देशमुख कुटुंबीय पोरके झाले आहे असेही संजय राऊतांनी सांगितले.
Published at : 19 Feb 2025 12:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion