एक्स्प्लोर
Share Market : सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्स निफ्टीकडून गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, पुन्हा घसरण सुरु, बाजारात काय सुरु?
Share Market Update : शेअर बाजारात शुक्रवारच्या घसरणीनंतर सेन्सेक्स अन् निफ्टी तेजीसह सुरु झाले मात्र त्यानंतर त्यात पुन्हा घसरण झाली.
शेअर बाजारात तेजीनंतर पुन्हा घसरण सुरु
1/6

भारतीय शेअर बाजारात घसरण सुरुच आहे. जागतिक बाजारातील चांगल्या संकेतानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुरुवातीला तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून 73427 अंकांवर पोहोचला होता. त्यानंतर त्यामध्ये घसरण झाली.10.10 वाजेपर्यंत सेन्सेक्स 367 अकांनी घसरुन 72841 अकांवर पोहोचला होता.
2/6

एनएसईवर निफ्टी 50 मध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 50 निर्देशांक 54.80 अंकांनी वाढून 22179 अंकांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर पुन्हा घसरण झाली. निफ्टी 50 22025 अंकांपर्यंत घसरण झाली आहे.
3/6

फेब्रुवारी महिन्यातील उत्पादन क्षेत्राचा पीएमआयचा डेटा , तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी, विदेशी गुंतवणूकदारांची हालचाल यावरुन बाजाराची दिशा ठरेल.
4/6

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर 4 मार्चपासून टॅरिफ लादण्याची घोषणा केलीय. चीनवर 10 टक्के अधिक टॅरिफ लावणार असल्याचं ते म्हणाले. याशिवाय भारतासोबत रेसिप्रोकल टॅक्सचं धोरण असेल असं त्यांनी यापूर्वी जाहीर केलं म्हणजे भारत अमेरिकनं उत्पादनांवर कर आकारेल तितका कर अमेरिका भारतीय उत्पादनांवर आकारणार आहे. याचा देखील परिणाम पाहायला मिळतो.
5/6

आशियाई बाजारातून चांगले संकेत मिळाले होते. जपनाच्या निक्केई इंडेक्समध्ये 0.67 टक्के, टॉपिक्स इंडेक्समध्ये 0.75 टक्क्यांची वाढ झाली. ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स 200 इंडेक्स 0.22 टक्क्यांनी वाढला. अमेरिकेच्या बाजारात देखील तेजी पाहायला मिळाली. एसअँड पी, डॉव जोन्स, नॅस्डॅकमध्ये देखील तेजी आली होती.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 03 Mar 2025 10:14 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















