एक्स्प्लोर

Aurangabad News: काय सांगता! पोलिस भरतीसाठी चक्क बीएचएमएस-एमडी अन् बी-टेकचे विद्यार्थी

Aurangabad Police Bharti: औरंगाबादच्या पोलीस भरतीसाठी तब्बल 1 हजार 661 उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज दाखल केले आहे.

Aurangabad Police Bharti: औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलीस दलासाठी भरती प्रकिया सध्या सुरु आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांनी अर्ज दाखल केली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात एकूण 39 जागा भरल्या जाणार असून, यासाठी 5 हजार 725 अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे यांत बीएचएमएस -एमडी, एमई, बीई, एलएल. एम.,एलएल. बी.,एमबीए, एमएस्सी, फार्मा पदवीधरकांसह तब्बल 1 हजार 661 उच्चशिक्षित तरुणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे यातून उच्चशिक्षितांची महाराष्ट्रातील बेरोजगारीचं चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. 

औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलासाठी सद्या ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या गोकुळ क्रीडा मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण 39 पदांसाठी ही भरती असून, त्यात महिलांची 12 पदे आहेत. या 39 पदांसाठी 4 हजार 225 पुरुषांचे, तर 1 हजार 500 अर्ज महिलांचे आले आहेत. या भरतीला 2 जानेवारीपासून सुरवात झाली असून, कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी आणि मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. यासाठी पहिल्याच दिवशी 500 जणांना बोलवण्यात आले होते. तर गेल्या तीन दवसांत 2 हजार 100 उमेदवारांना बोलवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात 1 हजार 102 उमेदवार उपस्थित होते. ज्यातील 907 जण पात्र ठरले. मात्र यावेळी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षितांची मोठी संख्या पाहायला मिळत आहे. 

उमेदवार आणि पदव्या 

अ.क्र. शिक्षण  उमेदवार संख्या 
01 बीएचएमएस-एमडी 01
02 एमई 03
03 बीई 37
04 बी-टेक 25
05 एमबीए 15
06 बी-फार्म 14
07 एम.कॉम. 27
08 एमएस्सी 35
09 एलएल.बी./ एलएल.एम. 02
10 बीएस्सी अग्रो  26
11 बीएसस्सी 407
12 बी. कॉम. 205
13 एमए  95
14 बीए  40

बेरोजगारीचा प्रश्न गंभीर

समोर आलेल्या आकडेवारीनुसार बीएचएमएस-एमडी आणि एलएल. बीसह एमबीए करणाऱ्या तरुणांनी देखील पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला आहे. राज्यासह देशात वाढती बेरोजगारीचे हे चित्र असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये 8 टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 मध्ये 8.3 टक्के झाल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीची (सीएमआई) आकडेवारी सांगते. धक्कादायक म्हणजे ग्रामीण बेरोजगारीचा दर 7.44 टक्के असून, शहरी बेरोजगारीचा दर 10.09 टक्के झाला आहे. त्यामुळे मिळेल तो जॉबसाठी तरुणांची धरपड सुरु आहे. औरंगाबादच्या पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या या तरुणांची शिक्षण पात्रता पाहिल्यास राज्यात बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे स्पष्ट होते. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Superfast News | दिल्ली विधानसभा | Delhi Assembly Election | दिल्लीतही कमळ | ABP MajhaDevendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोलाAnna Hazare on Delhi Election : दिल्लीच्या निकालावर अण्णा हजारे ढसाढसा रडले : ABP MajhaEkanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही  जिंकणार;एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Milkipur ByPoll Results : अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
Delhi Assembly Election Results 2025: दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, पण तरीही फायद्यात; केजरीवालांची AAP पराभूत झाल्याने नेमकं काय घडलं?
दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, पण तरीही फायद्यात; केजरीवालांची AAP पराभूत झाल्याने नेमकं काय घडलं?
Embed widget