एक्स्प्लोर

Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त

जुलै 2023 मध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी विभाजन झाल्यानंतर दिल्लीतील ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती .

Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला असून या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या 10 वर्षाच्या साम्राज्याला जनतेने उलथवून लावलं आहे . दिल्लीत भाजप सरकार स्थापन होत असल्याने भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे . दरम्यान महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीच्या निवडणुकीत 30 जागा लढवल्या होत्या .दिल्लीत अजित पवार गटातील सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झालंय .0.03% मतं पक्षाला मिळाली आहेत .दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पराभूत होणाऱ्या पक्षाने आत्म परीक्षण आणि आत्मचिंतन करावं,जनतेचा कौल मान्य करावा लागतो.दिल्लीत भाजपला जनतेने संधी दिली.सर्व नेत्यांचे अभिनंदन करतो असं ते म्हणालेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांचा दारुण पराभव केलाय .याशिवाय आम आदमी पक्षासह अनेक दिग्गज  दिल्लीत पराभूत झाले आहेत .महाराष्ट्रात महायुतीत असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला असून त्यांनी उभे केलेले 30 उमेदवार सपशेल आपटले आहेत .या उमेदवारांचा डिपॉझिटही जप्त झाला आहे . अजित पवार गटाला दिल्लीत केवळ 0.03 टक्के मते मिळाल्याने अजित पवार गटाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे .जुलै 2023 मध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी विभाजन झाल्यानंतर दिल्लीतील ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती .

अजित पवार गटाने कुठे कुठे उमेदवार उभे केले होते ?

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 30उमेदवार उभे केले होते .नवी दिल्ली ,कलकलजी ,करावल नगर यांसारख्या जागांवरही अजित पवारांचे उमेदवार होते . नवी दिल्ली मतदार संघातून विश्वनाथ अग्रवाल ,कलकाजी मतदारसंघातून जमील आणि करावल नगर मतदार संघातून संजय मिश्रा यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आलं होतं . बुरारी मध्ये रतन त्यागी ,बादलीमध्ये मुलायम सिंग ,चांदणी चौक -खालील रेहमान' ,कस्तुरबा नगर सुरेंद्र सिंग हुडा ,अशा महत्त्वाच्या जागी अजित पवारांनी उमेदवार दिले होते .

राष्ट्रवादीतील विभाजनानंतरची पहिलीच निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी महाराष्ट्र बाहेरील राज्य निवडणुका लढवल्या आहेत परंतु दिल्लीत त्यांना फारसे यश मिळाले नाही.2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागा लढवल्या होत्या .परंतु त्यातील एकही जागा त्यांना जिंकता आली नव्हती .जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झाल्यानंतर स्वतंत्रपणे अजित पवारांनी लढवलेली ही दिल्लीतील पहिलीच निवडणूक आहे .

हेही वाचा:

Delhi Election Result 2025: दिल्लीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी; पाहा एका क्लिकवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं  
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं  
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
Embed widget