Anna Hazare on Delhi Election : दिल्लीच्या निकालावर अण्णा हजारे ढसाढसा रडले : ABP Majha
Anna Hazare on Delhi Election : दिल्लीच्या निकालावर अण्णा हजारे ढसाढसा रडले : ABP Majha
अहमदनगर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाचा आणि अरविंद केजरीवाल यांचा मोठा पराभव झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे भावनिक झाल्याचं दिसून आलं. एवढं प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही रस्ता सोडून गेला. त्यामुळेच नाईलाजाने तुमच्याविरोधात बोलावं लागलं अशी प्रतिक्रिया देताना आण्णा हजारेंच्या डोळ्यातून पाणी आल्याचं दिसून आलं.
या आधीही आण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. ऐन निवडणुकीच्या दिवशी आण्णा हजारे यांनी केजरीवाल हे स्वार्थी असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांच्या पक्षाला मतदान करू नये असंही त्यांनी म्हटलं होतं. दिल्लीकरांनी आपला नाकारलं असून स्वतः अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर आण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.























