Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही जिंकणार;एकनाथ शिंदे
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचं कमळ फुललं. मात्र त्याहूनही मोठा धक्का आपला बसला तो म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांना पराभूत करत भाजपचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले. त्याचबरोबर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियाही या निवडणुकीत पराभूत झाले. जंगपुरा मतदारसंघातून सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या तरविंदरसिंग मारवाह यांच्याकडून सिसोदिया पराभूत झालेत. केजरीवाल आणि सिसोदियांच्या पराभवाचा सर्वात मोठा धक्का आपला सहन करावा लागलाय. मात्र एकीकडे हे दोन मोठे धक्के बसले असतानाच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांची जागा मात्र थोडक्यात वाचली.




















