Crime News: तब्बल 11 वर्षे पोटच्या लेकीवर बापाकडून अत्याचार; सहा वर्षांची असतानाच...
पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या असून, बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरातील भारतनगरमध्ये संतापजनक घटना समोर आली असून, सख्ख्या बापानेच पोटच्या लेकीवर तब्बल 11 वर्षे अत्याचार केल्याचं समोर आले आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून बापाकडून सुरु झालेला अत्याचार 11 वर्षे उलटूनही सुरूच असल्याने या अत्याचाऱ्याला कंटाळून मुलगी घरातून पळून गेली. त्यांनतर पोलिसांनी तिचा शोध घेतला असता धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेणारी 17 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात अली होती. पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा शोध सुरु केला आणि परभणी जिल्ह्यातून तिला शोधून आणलं. त्यांनतर मुकंदवाडी पोलिसांकडून तिला विश्वासात घेऊन पळून जाण्याचे कारण विचारले असता पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण अवघ्या 6 वर्षांची असताना जन्मदात्या बापाची तिच्यावर वाईट नजर पडली. तेव्हापासून हा नराधम बाप तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार करत असल्याच तिने पोलिसांना सांगितले.
तब्ब्ल 11 वर्षे या पीडित मुलीने बापाचा अत्याचार निमूटपणे सहन केला. दरम्यान दीड मिहन्यापूर्वी या नराधमाने मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा अत्याचार केला. त्यामुळे परभणी जिल्ह्यात राहणाऱ्या एका मित्राकडे ती पळून गेली. त्यांनतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसात मुलीच्या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली आहे.