Tornadoes Hit America : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Tornadoes Hit America : कॅन्ससमध्ये धुळीच्या वादळाने महामार्गावर सुमारे 50 वाहने आदळली. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. मिसिसिपीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता आहेत.

Tornadoes Hit America : अमेरिकेतील अलाबामा, मिसिसिपी, लुईझियाना, इंडियाना, आर्कान्सा, मिसूरी, इलिनॉय आणि टेनेसी राज्यात चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. एबीसीच्या रिपोर्टनुसार, या राज्यांमध्ये आतापर्यंत 40 चक्रीवादळ आले आहेत. परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसात 34 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मिसूरीमध्ये सर्वाधिक 12 मृत्यू झाले आहेत. 10 कोटी अमेरिकन लोकसंख्या प्रभावित आहे. दोन लाख घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.
DRONE DAMAGE: Our field correspondents are on the ground in Tylertown, MS after a large and powerful #tornado 🌪️ tore through the community. #MSwx
— WeatherNation (@WeatherNation) March 15, 2025
Take a look at the scenes below 🔽🔽 pic.twitter.com/iOvjAJpoeR
धुळीच्या वादळाने महामार्गावर सुमारे 50 वाहने आदळली
कॅन्ससमध्ये धुळीच्या वादळाने महामार्गावर सुमारे 50 वाहने आदळली. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. मिसिसिपीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता आहेत. 100 किमी/ताशी वेगाने धुळीचे वादळ वाहत आहे. आर्कान्सासमध्ये वादळाचा वेग 265 किमी/ताशी नोंदवण्यात आला. इमारती आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. कॅनडाच्या सीमेवर बर्फाचे वादळ आणि उष्ण भागात जंगलात आग लागण्याची शक्यता आहे.
🚨 Tornado Outbreak Devastates Midwest! 🌪️
— MangoWorxMedia (@MangoWorxMedia) March 15, 2025
On March 14, 2025, a tragic event unfolded across Missouri, Arkansas, Mississippi, and Illinois. The SPC confirmed 23 tornadoes, leaving a trail of destruction:
- Missouri: 9 tornadoes
- Arkansas: 6 tornadoes
- Mississippi: 5 tornadoes… pic.twitter.com/WpUzUQVecL
टोर्नेडोचा वेग वाढेल, बेसबॉलच्या आकाराच्या गारा पडतील
अमेरिकन स्टॉर्म प्रेडिक्शन सेंटरने दावा केला आहे की या वेगवान चक्रीवादळांमुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. आजही अनेक राज्यांमध्ये बेसबॉल आकाराच्या गारपीट आणि चक्रीवादळाची शक्यता आहे. पूर्व लुईझियाना, मिसिसिपी, अलाबामा, पश्चिम जॉर्जिया आणि फ्लोरिडामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. टेक्सास, कॅन्सस, मिसूरी आणि न्यू मेक्सिकोला वणव्याचा धोका आहे. टेक्सास, ओक्लाहोमा, मिसूरी, इलिनॉय, इंडियाना आणि मिशिगनमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे दोन लाखांहून अधिक घरांची वीज गेली आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने दक्षिण डकोटा आणि पश्चिम मिनेसोटाच्या काही भागांसाठी बर्फाच्या वादळाचा इशारा जारी केला आहे. या भागात 6 इंचांपर्यंत बर्फ पडण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

