(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cancer Research: कीमो, रेडिओथेरपीपेक्षा वेगळं, पण खात्रीशीर इलाज; 'या' तंत्रानं कॅन्सर दूर होणार!
Cancer Study: शास्त्रज्ञांनी कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी नवीन तंत्र विकसित केलं आहे. कर्करोगाच्या उपचारात हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
Cancer Study: कर्करोगग्रस्तांच्या उपचारासाठी (Treatment of Cancer Patients) एक आशादायी बातमी. शास्त्रज्ञ कर्करोगग्रस्तांच्या (Cancer) उपचारासंदर्भात एक महत्त्वाची चाचणी करत आहेत. जर ही चाचणी यशस्वी झाली, तर कर्करोगाच्या उपचारात नवं तंत्रज्ञान विकसित करणं शक्य होईल. देशासह जगभरातील अनेकजण कर्करोगाचा सामना करत आहेत. कर्करोगाचे उपचार जेवढे प्रभावी असतात, तेवढेच ते अत्यंत वेदनादायी असतात. एखाद्या व्यक्तीला या आजाराची माहिती फार क्वचितच पहिल्या स्टेजमध्ये मिळते. अॅडव्हान्स स्टेजमध्ये प्रामुख्यानं कर्करोगाची लक्षणं दिसण्यास सुरुवात होते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. या जीवघेण्या आजारावर ठोस उपचार शोधण्यासाठी शास्त्रज्ञांकडून सातत्यानं प्रयत्न सुरु आहेत. आता शास्त्रज्ञांनी कर्करोगावरील उपचारांसाठी नवं तंत्र विकसित केलं आहे.
CRISPR Gene Editing Technique च्या मदतीनं केले जाणार उपचार
शास्त्रज्ञांनी प्रथमच CRISPR Gene Editing Technique चा वापर केला आहे. त्यात Gene इंसर्ट केले जाणार. ज्यामुळे इम्यून सेल्स कॅन्सर पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करण्याचं काम करतात. या तंत्राचा सामान्य पेशींवर मात्र कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. तसेच, यामुळे इम्युनोथेरपीचा प्रभाव देखील वेगानं वाढण्यास मदत होईल. हे Gene Editing Technique यापूर्वी मानवांमधील विशिष्ट Gene हटविण्यासाठी वापरलं गेलं आहे. याच्या मदतीनं कर्करोगाच्या पेशींविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय केली जाऊ शकते.
जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालंय संशोधन
जर्नल नेचर मध्ये कर्करोगावरील उपचारांच्या तंत्रज्ञाना संबंधित संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. संशोधनात नोंदवण्यात आलेल्या निरिक्षणात असं नोंदवलं गेलंय की, CRISPR चा वापर केवळ विशिष्ट जनुकांना बाहेर काढण्यासाठीच नाही तर रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये काही नवीन जनुकांचा समावेश करण्यासाठी देखील करण्यात आला. याच्या मदतीनं जीन्स (Genes) आणि पेशी (Cells) रुग्णाच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये होणारे बदल सहज ओळखतील.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, "ज्यावेळी रुग्णांना पुन्हा कॅन्सरचा संसर्ग होतो, त्यावेळी CRISPR तंत्रज्ञानातील रोगप्रतिकारक पेशी कर्करोगाच्या पेशींना ओळखण्यास सुरुवात करतं. त्यावेळी कर्करोगाविरोधात पेशींचा एक समूह तयार होतो. व्यक्तीच्या इम्यून सिस्टममध्ये इम्यून सेल्सवर विशिष्ट रिसेप्टर्स असतात. हे विशेषतः कर्करोगाच्या पेशी ओळखू शकतात आणि त्यांना सामान्य पेशींपासून वेगळे करू शकतात.
कर्करोगाच्या पेशी वेगळं करतं तंत्रज्ञान
इम्यून रिसेप्टर्सचा वापर Gene Editing चा वापर करून कर्करोग ओळखण्यासाठी केला जातो. यासाठी, रोगप्रतिकारक पेशींना योग्य दिशा देण्याचं काम हे तंत्रज्ञान करतं. शास्त्रज्ञ म्हणतात की, कर्करोगाच्या उपचारात हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरणार आहे. इम्यून रिसेप्टर वेगळं करून कर्करोगाच्या पेशी ओळखणं आणि त्यावर उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )