Havishi Vate : विशाल फाले, शुभांगी गायकवाडच्या जोडीला चाहत्यांची पसंती, ‘हवीशी वाटे' म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला
Havishi Vate : 'चिंब झालं आज उधाण वारं, हवीशी वाटे तू मला' असे शब्द असलेला 'हवीशी वाटे' हा नवाकोरा म्युझिक अल्बम सप्तसूर म्युझिकने लाँच केला आहे.

Havishi Vate : 'चिंब झालं आज उधाण वारं, हवीशी वाटे तू मला' असे शब्द असलेला 'हवीशी वाटे' (Havishi Vate) हा नवाकोरा म्युझिक अल्बम सप्तसूर म्युझिकने लाँच केला आहे. सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि अभिनेता विशाल फाले (Vishal Phale) या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकला आहे. या म्युझिक व्हिडीओला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. प्रेक्षकांना आणि चाहत्यांना देखील ही जोडी आवडली आहे.
सुशील बनसोडे प्रॉडक्शनच्या सुशील बनसोडे यांनी 'हवीशी वाटे' या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी हा म्युझिक अल्बम प्रस्तुत केला आहे. राहुल काळे यांनी लिहिलेलं 'हवीशी वाटे' हे गीत विजय भाटे यांनी संगीतबद्ध केलं आहे. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे यांनी हे गाणं गायलं आहे. सचिन कांबळे म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शक आहेत. विशाल फाले आणि शुभांगी गायकवाड ही जोडी म्युझिक अल्बममध्ये आहे.
पाहा गाणं :
गाण्यातून मांडण्यात आली प्रेमकथा
विशाल फालेने आतापर्यंत त्याच्या मनोरंजक आणि प्रेरणादायी व्हिडीओच्या माध्यमातून लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. ‘हवीशी वाटे’ या म्युझिक अल्बमद्वारे एक प्रेमकथा मांडण्यात आली आहे. हळूवार शब्द, मनात सहजच रुंजी घालणारी चाल, केवल वाळंज, सोनाली सोनावणे यांचा श्रवणीय आवाज आणि उत्तम छायांकन हे या म्युझिक व्हिडीओचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विशालच्या इतर व्हिडीओजप्रमाणेच चाहत्यांकडून 'हवीशी वाटे' या म्युझिक व्हिडीओलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सोशल मीडियावर ट्रेंडीग सिंगर म्हणून प्रसिद्ध असणारी गोड गळ्याची गायिका सोनाली सोनावणे (Sonali Sonawane) हीच्या जादुई आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. ‘माझी बाय गो’, ‘मी नादखुळा’, ‘पिरतीचं गाव’, ‘पोरी तुझे नादानं’ अशी तिने गायलेली कित्येक गाणी बऱ्याच म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंडीग आहेत. नुकतचं 'अहो शेठ लय दिसान झालीया भेट' या तिने गायलेल्या पहिल्याच लावणीने 10 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. तिच्या जादुई आवाजाच्या अनोख्या शैलीमुळे तिची गाणी चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
