Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार
Andheri Murder : आरोपी आणि मृत व्यक्तीचा आधीपासूनच वाद होता. या दोघांमध्ये सातत्याने भांडणे व्हायची आणि त्यातूनच आरोपीने हे कृत्य केलं.

मुंबई : अंधेरीत एक धक्कादायक घटना घडली असून 41 वर्षांच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. शेजारी-शेजारी राहणाऱ्यांचा वाद इतक्या टोकाला गेला की एकाने त्याच्या पोटात चाकू मारून त्याची हत्या केली. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सुजित सिंह असं मृत तरुणाचे नाव आहे. तर सुनील कोकाटे असं आरोपीचं नाव असून अंधेरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
मयत सुजित सिंह आणि आरोपी सुनील कोकाटे हे अंधेरीच्या कोल डोंगरी येथील माला धारी रहिवाशी संघ येथे एकमेकांच्या शेजारी राहतात. मागील अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत होते. याचाच राग सुनीलच्या मनात होता.
गुरूवारी याच पूर्ववैमन्यसातून सुनीलने सुजित सिंह याच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी आजूबाजूचे रहिवासी या दोघांमधील वाद सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आले. पण तोपर्यंत सुनील कोकाटेने सुजित सिंहला चाकूने मारले होते. त्यावेळी सुजितच्या पोटातून रक्त वाहू लागले आणि तो गंभीर जखमी झाल्याचं दिसून आलं.
या हल्यात जखमी झालेल्या सुजितली उपचारासाठी भाभा रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी सुनिल कोकाटेला पोलिसांनी अटक केली आहे.
50 रुपयांच्या वादातून नाशिकमध्ये मजुराची हत्या
नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परप्रांतीय व्यक्तीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याची घटना घडली होती. या घटनेमुळं परिसरातएकच खळबळ उडाली होती. शांतीलाल ब्राह्मणे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकचा तपास केला असता, आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत एका मजुराने दुसऱ्या मजुराच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे एकमेकांना ओळखीत होते. या दोघांमधील एकाला 200 रुपये तर दुसऱ्याला 150 रुपये दिवसाला पगार मिळत होता. याच कारणावरुन झालेल्या वादातून शांतीलाल ब्राम्हणे यांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. संतोष अहिरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.
ही बातमी वाचा:























