PAK vs NZ : काळी मांजर मैदानातून गेली अन्... चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तोंडघशी पडला पाकिस्तान! न्यूझीलंडने जिंकले विजेतेपद, पाहा Video
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका खेळवण्यात आली.

New Zealand Beat Pakistan Tri Series Final Before Champions Trophy : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका खेळवण्यात आली. ज्याचा अंतिम सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झाला, ज्यामध्ये न्यूझीलंडने पाच विकेट्सने सहज विजय मिळवला. तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यातही पाकिस्तानी संघाला दारुण पराभव पत्करावा लागला होता.
अशा परिस्थितीत, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, त्यांना घरच्या मैदानावर वाईट पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेटने एक्स वर शेअर केलेल्या 40 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सामन्यादरम्यान एक काळी मांजर मैदानात प्रवेश करताना दिसत आहे. ही मांजर संपूर्ण मैदानात फिरते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेटने लिहिले आहे की, आमच्याकडे मैदानावर मांजर क्रिकेटचा आनंद घेत आहे. पण नेटकऱ्यांकडून अनेक तर्क लावल्या जात आहे. काळी मांजर मैदानातून गेली त्यामुळे पाकिस्तानने मॅच गमावली, असे काही जण म्हणत आहे.
We've got some feline company enjoying cricket on the ground 🐈⬛🤩#3Nations1Trophy | #PAKvNZ pic.twitter.com/Nx2RMmzA82
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 14, 2025
पाकिस्तानची सुरुवात खराब
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अंतिम सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. गेल्या सामन्यात संघाने ज्या प्रकारची फलंदाजी केली होती आताही तेच करेल असे वाटत होते, पण प्रथम फलंदाजी करण्याचा त्याचा निर्णय उलटा ठरला. पाकिस्तानचा कोणताही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकला नाही. संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा फखर झमान (10 धावा) आणि सुपरस्टार फलंदाज बाबर आझम यांना फक्त 29 धावा करता आल्या. पाकिस्तानने फक्त 53 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या.
तीन विकेट पडल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सलमान अली आगा यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रिझवानने 46 धावा केल्या आणि सलमानने 46 धावा केल्या. तय्यब ताहिरने 38 धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. या कारणास्तव, पाकिस्तानी संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि फक्त 240 धावांवर सर्वबाद झाला.
New Zealand lift the VGO TEL Mobile presents @ABLpk Tri-Nation Series 2025 trophy in Karachi#3Nations1Trophy | #PAKvNZ pic.twitter.com/8xp5rF4AX6
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 14, 2025
विल्यम ओ'रोर्कने घेतल्या चार विकेट्स
न्यूझीलंडकडून विल्यम ओ'रोर्क सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 43 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या खेळाडूंनी पाकिस्तानी फलंदाजांना हात उघडण्याची संधी दिली नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल आणि टॉस लॅथम हे न्यूझीलंडसाठी सर्वात मोठे हिरो ठरले. न्यूझीलंडला सामना जिंकण्यास मदत करण्यात या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. मिशेलने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर लॅथमने 56 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानचे गोलंदाज खूपच अपयशी ठरले. अबरार अहमदने 10 षटकांत 67 धावा दिल्या. तर सलमान अली आगाने 10 षटकांत 45 धावा दिल्या.
तिरंगी मालिकेत पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासह दोन सामने गमावावे लागले. तर पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
