एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत?
काही प्रश्न अगदीच विचित्र असतात. पण ‘आपल्यापासून अजून ते दूर आहेत’ म्हणत त्याबाबत भूमिका घेणं टाळण्यात अर्थ नसतो. जग इतक्या वेगाने बदलतंय की, आपल्यावर केव्हा कुठले बदल येऊन आदळतील याची काहीएक खात्री राहिलेली नाही. अशा दिवसांत एखादी समस्या दारात आली की, मगच तिचा विचार करू आणि तो मुद्दा उचित आहे की अनुचित हे त्याचवेळी ठरवू असं म्हणणं म्हणजे ठिणगी पडल्यावर अग्निशामक यंत्रणा घरात बसवण्यासारखं होईल.

काही प्रश्न अगदीच विचित्र असतात. पण ‘आपल्यापासून अजून ते दूर आहेत’ म्हणत त्याबाबत भूमिका घेणं टाळण्यात अर्थ नसतो. जग इतक्या वेगाने बदलतंय की, आपल्यावर केव्हा कुठले बदल येऊन आदळतील याची काहीएक खात्री राहिलेली नाही. अशा दिवसांत एखादी समस्या दारात आली की, मगच तिचा विचार करू आणि तो मुद्दा उचित आहे की अनुचित हे त्याचवेळी ठरवू असं म्हणणं म्हणजे ठिणगी पडल्यावर अग्निशामक यंत्रणा घरात बसवण्यासारखं होईल.
लैंगिक खेळण्यांची अधिकृत दुकानं आपल्या देशात नाहीत, मात्र अनधिकृत मार्गाने अशी खेळणी मिळत असतात वा परदेशातून आणली जातात. आता इंटरनेट वरील खरेदीविक्री वाढीस लागल्यापासून, बरीचशी सोपी झाल्यापासून तर ही खेळणी बऱ्यापैकी सहज उपलब्ध होताहेत. ज्या लोकांना लैंगिकतेत नाविन्य हवं असतं, ते त्यातही नवनवी उपकरणं शोधत असतात. त्यामुळे बाजारात असंख्य निरनिराळ्या वस्तू येत असतात. लैंगिक खेळणीच नव्हे, तर इतर दैनंदिन उपयोगाच्या वस्तूदेखील अनेकदा ढळढळीत व बटबटीत लैंगिकता दाखवणाऱ्या असतात आणि अर्थातच पुरुष ग्राहकांची संख्या जास्त असल्याने स्त्रीचे खासगी अवयव हा त्या वस्तूंचा विषय असतो. मध्यंतरी अॅमॅझॉन या साईटवरून योनीच्या आकाराचे अॅश ट्रे विकले जात होते. प्रचंड टीका आणि निषेध झाल्यानंतर अॅमॅझॉनने ती विक्री थांबवली, पण ते बनवणाऱ्या कंपनीने मात्र ते उत्पादन मागे घेतलं नाही.
यालाच जोडून पुढचा प्रश्न येतो की, या लैंगिक खेळण्यांचं ‘स्वरूप’ काय आहे? व्हायब्रेटरसारख्या किरकोळ वस्तू कोणतीही विजेची उपकरणं मिळणाऱ्या दुकानांत आजकाल सर्रास मिळतात, त्यामुळे ती अनेकांना ‘पाहून’ तरी माहीत असतात; अगदी मानवी आकाराच्या स्त्री-पुरुष ‘बाहुल्या’ मिळतात, हेही ‘ऐकून’ किंवा परदेशी प्रवासात प्रत्यक्ष पाहून / क्वचित अनुभवून माहीत असतं; त्यापुढील टप्पा आहे तो रोबोटचा. आपल्या कल्पनांनुसार, अगदी प्रिय व्यक्तीचा चेहरामोहरा देऊन रोबोट ऑर्डर करायचा आणि आपल्या लैंगिक आवडीनिवडी त्या यंत्राला भरवून हवं तेव्हा, हवं तसं, हवं तितकं लैंगिक सुख अनुभवायचं... सोपं आहे की.
आता यात कुणी योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक असे प्रश्न आणताच कामा नयेत. आपलं यंत्र दुसऱ्या कुणी वापरलं, तरी त्यामुळे पझेसिव्ह व्हायला होणार नाही. यंत्रावर कुणी व्यभिचाराचे आरोप करणार नाही आणि अनेक यंत्रं वापरणाऱ्या माणसांवर देखील असे आरोप होणार नाही. यंत्रांची सवय होऊन माणसं अजिबातच नकोशी होऊ शकतात, लोक माणूसघाणे बनू शकतात वगैरे मुद्दे ज्यांना माणसं हवी आहेत व उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी ठीक; बाकीच्यांना नकोच असतील माणसं तर काय?
या यंत्रांचे फायदेही आहेतच. माणसांच्या लैंगिक गरजा व्यवस्थित भागल्या की, त्यांच्यातली आक्रमकता, हिंस्रता कमी होईल; निदान आटोक्यात येईल. छेडछाड, विनयभंग, लैंगिक छळ, विकृत लैंगिक मागण्या, बलात्कार... हे सारे अत्याचार कमी होतील. अशा गुन्ह्यांचं प्रमाण घटल्याने निदान काही बाबतीत तरी समाजात शांतता नांदेल. लैंगिक गरजा व्यवस्थित भागल्याने माणसं आपलं लक्ष कामाधामावर व्यवस्थित केंद्रित करू शकतील आणि त्यांची कार्यक्षमता वाढून तिचाही समाजाला उपयोग होईल वगैरे. लैंगिक गरजांच्या बाबत एकमेकांवर अवलंबून न राहिल्याने नाती अधिक निकोप, नि:स्वार्थ बनतील; पतीपत्नीत लैंगिक आवडीनिवडी भिन्न असल्याने होणारे वाद व काहीवेळा होणारे अत्याचारही टळतील.
पण हे खरंच होईल की, ही केवळ एक कल्पना आहे?
आजवर झालेलं संशोधन असं सांगतं की, लैंगिक खेळणी वापरणाऱ्या लोकांच्या मनात जर लैंगिक विकृती असतील तर त्या ही खेळणी वापरून कमी झालेल्या आढळत नाहीत. माणसं यंत्र नाईलाजाने वापरतात, प्रत्यक्षात त्यांना ‘जिवंत माणसं’च जोडीदार म्हणून हवी असतात. कितीही दर्जेदार व उत्कृष्ट यंत्रं वापरली, तरीही त्यांना संधी मिळताच ते प्रत्यक्षात एखाद्या स्त्रीवर बलात्कारही करू शकतात. लैंगिक खेळणी त्यांची लैंगिक गरज तात्पुरती भागवत असली आणि त्यांना या यंत्रांचं व्यसन लागलं तरी त्यामुळे प्रत्यक्ष वर्तनातली त्यांची मानसिकता व त्यांचे विचार बदलत नाहीत. एकुणात हे फायदे वगैरे सांगणं फिजूल आहे.


( कॉलिन थॉम्सन या कंपनीचा हा अॅश ट्रे अद्याप बाजारात उपलब्ध आहे. )
( अॅमॅझॉनने आता हा अॅश ट्रे मागे घेतला असला, तरी बाह्य बाजारात तो अद्याप उपलब्ध आहेच. )
ज्या व्यक्तींना नैतिक-अनैतिकरित्या कुणा स्त्री वा पुरुषाशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचे नाहीत, स्त्रीवेश्या वा पुरुषवेश्या नको आहेत किंवा इच्छा असूनदेखील विविध कारणांनी ( सामाजिक, धार्मिक, आर्थिक, वैद्यकीय इत्यादी कारणं ) ते शक्य होत नाही, त्यांनी आपली लैंगिक गरज भागवण्यासाठी एखादं यंत्र वापरण्यात गैर काय? – असा प्रश्न आहे. स्त्रियांना तर पुरुषवेश्या उपलब्ध होण्याचा पर्याय अगदीच क्वचित उपलब्ध होतो, पुरुषांना ठेवणे हा प्रकारही दुर्मिळ; त्यामुळे व्यभिचाराचं प्रमाण मोठं. ते आजचं नव्हे, तर सार्वकालिक आहे आणि जगभर सार्वत्रिकदेखील. त्यात स्त्रियांची लैंगिक गरज तर भागू शकते, पण अनेक व्यक्तिगत व सामाजिक तोटे वाट्याला येतात. अशा परिस्थितीत त्यांनी लैंगिक खेळणी वापरून आपल्या गरजा गुपचूप भागवल्या, तर त्यात कुणाचं काय नुकसान आहे? – हा युक्तिवाद वरवर पाहता योग्य वाटतो, मात्र त्यात अनेक छुपे प्रश्न आहेत. हाच युक्तिवाद असाही वापरला जाऊ शकतो की, संकोची व लाजाळू स्वभावाचे पुरुष, संधी न मिळालेले व मिळालेली संधी वापरण्यास घाबरणारे पुरुष, घरसंसारमुलं इत्यादी झमेल्यात अडकू न इच्छिणारे व विशेष लैंगिक महत्त्वाकांक्षा नसणारे पुरुष यांनी लैंगिक खेळणी वापरण्यास काय हरकत आहे?


( नॉर्वेतली चाईल्ड सेक्स डॉल )
ही चर्चा आत्ता करण्याचं कारण काय? दोन कारणं आहेत... पहिलं म्हणजे लहान मुलींच्या रूपा – आकाराचे सेक्स रोबोट्स जगाच्या बाजारात आले आहेत. लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार त्यामुळे कमी होतील, अशी चर्चा त्याबाबत सुरू झाली आहे आणि अर्थातच तज्ज्ञ मंडळींचा याला विरोध आहे. दुसरं कारण असं की, सध्या स्त्रीदेह धारण केलेलेच सेक्स रोबोट उपलब्ध असले तरी या नव्या वर्षात, म्हणजे २०१८ साली पुरुष सेक्स रोबोट येऊ घातल्याची बातमी आली आहे. एकट्या राहणाऱ्या, राहू इच्छिणाऱ्या स्त्रियांना त्यामुळे दिलासा वाटतोय; समाजात स्त्रियांचं प्रमाण कमी झाल्याने लग्नं न जमणाऱ्या पुरुषांची, हुंडे मागणाऱ्या वरपक्षाची, स्त्रियांना आपली इतकीही गरज राहिली नाही तर त्या अधिक मोकाट बनतील असं भय बाळगणाऱ्या संस्कृती रक्षकांची धास्ती वाढली आहे. यातून स्त्रियांवर, लहान मुलामुलींवर होणारे लैंगिक अत्याचार वाढत जातील, असं अभ्यासकांना वाटतंय. काय होईल याचे हे केवळ निरनिराळे अंदाज आहेत. अर्थात ते खरे होण्याची वेळ फारशी दूर राहिलेली नाही.‘चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग :
चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्टचालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं
चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो... चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही... चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’ चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
