एक्स्प्लोर

Surya Shani Yuti: तब्बल 12 महिन्यांनी बनला सूर्य-शनीचा अद्भूत योग! 'या' 5 राशींचे भाग्य सोन्यासारखं चमकणार, नोकरीत पगारवाढ, धनवृद्धीचे संकेत?

Surya Shani Yuti: ज्योतिषांच्या मते, सूर्य-शनिच्या असा प्रकारचा महासंयोग, जो 5 राशींसाठी अत्यंत फायदेशीर आहे, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

Surya Shani Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 हे वर्ष अत्यंत खास आहे. ग्रहांच्या मोठ्या हालचाली, राशीपरिवर्तन आणि युती होणार असल्याने अनेक राशींसाठी सुवर्णसंधी आहे. 12 पैकी काही राशी अशा आहेत, ज्यांना या ग्रहांच्या युतीचा मोठा लाभ होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी सूर्याचेही कुंभ राशीत संक्रमण झाले आहे. या राशीमध्ये शनि आधीच उपस्थित आहे, जो स्वतःची राशी आहे आणि येथे तो मजबूत स्थितीत राहतो. ज्योतिषांच्या मते, 12 फेब्रुवारी 2025 रोजी कुंभ राशीमध्ये तयार झालेला सूर्य आणि शनीचा हा संयोग एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. ज्योतिषशास्त्रीय भाषेत या प्रकारच्या संयोगाला ‘इत्थशाल योग’ असेही म्हणतात. सूर्य आणि शनीच्या या संयोगाला 'महायुती' असेही म्हटले जात आहे, जो 5 राशींसाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या..

सूर्य-शनि महासंयोगाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनीचा संयोग नवीन कल्पना आणि नवनिर्मितीसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे ही युती समाज आणि तंत्रज्ञानाशी निगडीत क्षेत्रात नवे बदल घडवून आणणार आहे. त्यामुळे गुंतवणूक आणि तांत्रिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक शिस्तीने कामाच्या ठिकाणी शिस्त आणि मेहनत वाढेल. हा काळ लोकांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी देईल. याशिवाय या जुळवाजुळवातून सरकार आणि प्रशासनात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत असून न्याय आणि कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

महासंयोगाचा परिणाम सर्व राशींसाठी शुभ?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनीच्या दरम्यान 'इत्थशाल योग' तयार झाल्याने, एक विशेष ज्योतिषीय संयोग निर्माण होईल, जो सर्व राशींसाठी शुभ सिद्ध होईल. हा योग कर्म, नेतृत्व, शिस्त आणि प्रतिष्ठा मजबूत करेल आणि 5 विशिष्ट राशींना अपार यश मिळवून देईल. या राशी आहेत- वृषभ, मिथुन, सिंह, कुंभ आणि मीन. सूर्य-शनिच्या इथशाल योगामुळे मिथुन, तूळ, मकर, कुंभ आणि मेष राशीच्या लोकांना आर्थिक, करिअर आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळेल. या योगामुळे नेतृत्व, शिस्त आणि दीर्घकालीन यश मिळेल. या राशीच्या लोकांनी या वेळेचा योग्य वापर केल्यास त्यांना येणाऱ्या काळात धन, सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. चला जाणून घेऊया, या 5 राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल होतील?

वृषभ - करिअरमध्ये प्रगती

ज्योतिषशास्त्रानुसार, रवि-शनीच्या ईथशाल योगामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगती: जे लोक सरकारी किंवा प्रशासकीय सेवेत आहेत, त्यांना पदोन्नती आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला भरीव आर्थिक लाभ मिळेल. गुंतवणूक आणि व्यवसायात विशेषत: तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता आहे. जुना वाद मिटू शकतो, ज्यामुळे मानसिक आराम मिळेल. परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाच्या संधी मिळू शकतात. ही सहल व्यावसायिक किंवा शैक्षणिक कारणांसाठी असू शकते.

मिथुन - अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांना आयुष्यात अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात विशेषत: सर्जनशील क्षेत्रात उत्कृष्ट संधी मिळू शकतात. या योगाच्या प्रभावाने धनात वाढ होण्याचे प्रबळ संकेत आहेत. उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत उघडू शकतात. प्रॉपर्टी आणि शेअर मार्केटमधून मोठा फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीसाठी हा काळ चांगला आहे. परदेशात नोकरी किंवा शिक्षण घ्यायचे असल्यास हा काळ अनुकूल राहील.

सिंह - मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ यशाचा आहे. सिंह राशी ही सूर्याची राशी आहे, जो आत्म्याचा स्वामी आहे, आत्मविश्वास आणि शाही कर्मांचा स्वामी आहे, ज्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तुम्हाला कोणत्याही नवीन प्रकल्पात किंवा व्यवसायात नवीन करार मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक बळ मिळेल. कौटुंबिक आणि सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्हे आहेत, जी भविष्यात फायदेशीर ठरेल.

कुंभ - यश आणि बढती मिळण्याची शक्यता

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ ही शनिदेवाची मूळ त्रिकोणी राशी आहे. या राशीत सूर्य आणि शनीचा संयोग म्हणजेच इथशाल योग या राशीच्या लोकांमध्ये दृढनिश्चय आणि आत्मविश्वास वाढवेल. सूर्य आणि शनीच्या या संयोगामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची नेतृत्व क्षमता वाढेल. करिअरच्या क्षेत्रात यश आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन नियोजनासाठी हीच योग्य वेळ आहे. कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर हा काळ अनुकूल राहील.

मीन - करिअर आणि व्यवसायात फायदा

हा योग मीन राशीच्या लोकांमध्ये धैर्य आणि निर्णय क्षमता वाढवणारा सिद्ध होतो. हा काळ तुम्हाला काही मोठे निर्णय घेण्याचे धैर्य देईल, ज्यामुळे करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. तुमच्यामध्ये नेतृत्व क्षमता विकसित होईल, ज्यामुळे नोकरी किंवा राजकारणात प्रगती होईल. शत्रूंवर विजय मिळेल. न्यायालयीन प्रकरण किंवा कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अडकलेल्या लोकांना दिलासा मिळेल. उच्च शिक्षणाची आवड असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते.

हेही वाचा>>>

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार 'गेमचेंजर'! अद्भूत योग बदलणार नशीब, भगवान भोलेनाथ होणार प्रसन्न!

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

ब्रेकिंग तसेच ताज्या बातम्यांसाठी पाहा...

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
Disha Salian Case: दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 20 March 2025TOP : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवानABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 20 March 2025Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्यानं NIA मार्फत चौकशी करण्याची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
Disha Salian Case: दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Disha Salian Case & Aaditya Thackeray: शाहरुखच्या मुलाला अटक करणारा अधिकारी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार? दिशा सालियन केसची फाईल पुन्हा उघडणार
शाहरुखच्या मुलाला अटक करणारा अधिकारी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार? दिशा सालियन केसची फाईल पुन्हा उघडणार
Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
Embed widget