Dhule : धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस तरीही रब्बीचं क्षेत्र घटलं, 90 हजार हेक्टरवर पेरणी
धुळे (Dhule) जिल्ह्यातही यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, मात्र तरीही रब्बी हंगामाचे (Rabi Season) प्रस्तावित क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Dhule Agriculture News : राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rain) झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातही यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, मात्र तरीही रब्बी हंगामाचे (Rabi Season) प्रस्तावित क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 90 हजार 124 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागानं (Department of Agriculture) दिली आहे.
धुळे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या चार वर्षापासून जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होत आहे. एकीकडं या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कापूस, सोयाबीन, मका यासह विविध पिकांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळं जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. यंदा जिल्ह्यात 721 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा अधिक आहे. पाऊस जास्त झाला असला तरी दुसरीकडे मात्र धुळे जिल्ह्यातील यंदा रब्बी हंगामाचे प्रस्तावित क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहे. यावर्षी 90 हजार 124 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. तर गेल्या वर्षी 96 हजार 649 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या गहू, हरभरा या पिकांसाठी पाण्याची पुरेशा प्रमाणात सोय झाली आहे.
कोणत्या तालुक्यात किती पेरणी झाली?
धुळे तालुक्यात आत्तापर्यंत 17 हजार 500, साक्री तालुक्यात 20 हजार 738, शिंदखेडा तालुक्यात 32 हजार 178 तर शिरपूर तालुक्यात 19 हजार 708 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यानं यंदाही शेतकऱ्यांचा कल हा गहू हरभरा मका या पिकांच्या लागवडीकडे आहे. राज्यात यावर्षी सराकरीपेक्षा 126 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सुरुवातीच्या काळात जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होते. या स्थितीतून देखील काही शेतकऱ्यांनी पिकं वाचवली होती. मात्र, उरली सुरलं पिकं परतीच्या पावसानं वाया गेली. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Dragon Fruit : सांगलीतल्या दुष्काळी भागात फुलतायेत 'ड्रॅगन फ्रुटचे' मळे, शेतकऱ्यांना मिळतोय फायदा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
