एक्स्प्लोर
Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली, 4 टक्क्यांनी वित्तपुरवठा, KCC साठी कोणती कागदपत्रं आवश्यक?
Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा 3 लाखांवरुन 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. वर्षभरात कर्ज परतफेड केल्यास व्याजात 3 टक्के सूट मिळाली.

किसान क्रेडिट कार्ड
1/5

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना किसान क्रेडिट कार्डवरुन केला जाणारा वित्तपुरवठा 3 लाखांवरुन 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली.
2/5

किसान क्रेडिट कार्डची सुरुवात 1998 मध्ये झाली. आर. वी. गुप्ता समितीच्या शिफारशीवरुन नाबार्डकडून याची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत वेळोवेळी आढावा घेण्यात आला.
3/5

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दिलं जातं. पीकांच्या काढणीनंतरच्या खर्चासाठी, शेत मालाच्या मार्केटिंगसाठी देखील किसान क्रेडिट कार्डद्वारे वित्त पुरवठा केला जातो.
4/5

किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या गटाला दिलं जातं. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे ओळखपत्र, सातबारा, आठ अ उतारा, मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक असतो. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचं सभासद व्हावं लागतं.
5/5

किसान क्रेडिट कार्डवर 1 लाखांपर्यंतचं कर्ज बिनव्याजी मिळतं. 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावं लागत नाही. तर, तीन लाख ते पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावं लागेल. याशिवाय किसान क्रेडिट कार्डवर उपलब्ध होणारं कर्ज 7 टक्क्यांनी मिळतं. वर्षभरात ते परतफेड केल्यास 3 टक्के सूट मिळून 4 टक्यांनी कर्जाचा लाभ घेतला जाऊ शकतो.
Published at : 10 Feb 2025 03:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
जळगाव
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion