Ravindra Dhangekar Pune : आर्थिक हितसंबंधामुळेच बार रात्री उशीरापर्यंत सुरू राहतात - रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar Pune : आर्थिक हितसंबंधामुळेच बार रात्री उशीरापर्यंत सुरू राहतात - रवींद्र धंगेकर पुण्यातील एफ सी रोडवरील लाउंज मधे ड्रग सापडल्याचे समोर आल्याने विरोधकांनी पोलिस खात्यावर टीकेची झोड उठवलीय. पब आणि बार मालकांचे पोलीसांसोबत असलेल्या आर्थिक हितसंबंधांमुळे हे पब आणि बार उशीरापर्यंत सुरू रहात असल्याचा आरोप कॉग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय. त्याचबरोबर रात्री उशीरापर्यंत पार्टी आयोजित करणार्या अक्षय कामठेच्या मागे कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी होतेय. पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स (Pune Drugs) पकडले गेले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले. सदर प्रकरणात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारमालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी आठही जणांना पुणे पोलीस करणार कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला. याचदरम्यान पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे.