Shivsena Foundation Day : शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन वरळीच्या एनएससीआय डोममध्ये होणार
Shivsena Foundation Day : शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन वरळीच्या एनएससीआय डोममध्ये होणार शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत.. या वर्धापन दिना निमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम होणार आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंगा येथील बन्मुखानंद सभागृहात होत आहे तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी येथील डोम एनएससीआय सभागृहात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगुल दोन्ही शिवसेना नेते या मेळाव्यात फुंकण्याची शक्यता आहे उद्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला महत्त्व आहे.