Donald Trump Argument : युद्धविराम करा, नाहीतर अमेरिकेचा पाठिंबा विसरा, ट्रम्प यांचा इशारा
Donald Trump Argument : युद्धविराम करा, नाहीतर अमेरिकेचा पाठिंबा विसरा, ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांच्यात जाहीर भांडण झाले. रशियाशी युद्ध विराम करा नाहीतर अमेरिकेचा पाठिंबा विसरा अशा शब्दात ट्रम्प यांनी झेलेनस्की यांना खडसावलं. आम्ही युक्रेनला सा50 अब्ज डॉलर दिले, लष्करी साधन सामुग्री दिली. सर्व बाजूंनी पाठिंबा दिला, नाहीतर हे युद्ध दोन आठवड्यात संपल असतं असं म्हणत ट्रम्प यांनी केलेल्या मदतीची आठवण करून दिली. तुमचे लोक मरत आहेत, तुमच्याकडे लढायला सैनिक नाहीत आणि तुम्ही म्हणता मला शस्त्रसंधी नको. हे चालणार नाही. नी काय आश्वासन दिली मला माहित नाहीत, तेव्हा मी सत्तेत नव्हतो. तुम्हाला शांतता नकोच आहे. जेव्हा शांततेसाठी तयार असाल तेव्हाच इथे परत या असही ट्रम्प म्हणाले. हा वाद पाहून व्हाईट हाऊसच्या ओव्ल ऑफिसमध्ये जमलेले पत्रकारही चकित झाले. कारण आंतरराष्ट्रीय संबंध आणि बैठकांमध्ये सहसा पुढे रीत आणि विधीनिषेध बाजूला ठेवून वागत नाही.























