एक्स्प्लोर

Belgaum Municipal Corporation Election : आज बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान

Belgaum Municipal Corporation Election : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी (आज) सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे आणि आवश्यक साहित्य बेळगावातील बीके मॉडल हायस्कूल येथे वितरित करण्यात आलं आहे. 

निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शुक्रवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पार पडणार असल्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी यावेळी पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार आहे. निवडणुकीसाठी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून 1,826 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

बेळगाव महानगरपालिका निवडणूकीत 58 प्रभागांसाठी मतदान होणार असून एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप 55,काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जे डी एस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 असे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 428364 इतके मतदार असून त्यामध्ये  213536 पुरुष आणि 214834 महिला मतदार आहेत. मतदानासाठी 415 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 1828 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचारी आणि एक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस यांच्या व्यतिरिक्त सहा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. 300 होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत.

राष्ट्रीय पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला 

महानगरपालिकेच्या समोर लावण्यात आलेला बेकायदेशीर लाल पिवळा झेंडा, शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास करण्यात आलेला विरोध,कन्नड मधून कागदपत्रे देणे, मराठी भाषिकांची गळचेपी करणे, कन्नड फलक लावण्याची सक्ती करणे आदी मुद्दे महाराष्ट्र एकीकरण समितिच्या उमेदवारांनी प्रचारात अधोरेखित केले आहेत. राष्ट्रीय पक्षाने विकासाचे गाजर आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी अस्मितेचा,संस्कृतीचा महाराष्ट्र एकीकरण समितिचा मुद्दा, राष्ट्रीय पक्षाकडून दाखवली जाणारी प्रलोभने या बरोबरच अन्य अनेक विषय यावेळच्या महानगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.

दरम्यान, राज्यातील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

भारत व्हिडीओ

Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget