Ganga River Water Purification Study : गंगेचं पाणी शुद्ध का राहते?
गंगेच्या पाण्यात स्वत:हून शुद्ध होण्याचे गुणधर्म, संशोधकांचा दावा. निरीच्या संशोधनातील माहिती 'एबीपी माझा'च्या हाती. संगमावर कोट्यवधींची गर्दी, तरीही गंगा शुद्धच, संशोधकांचा दावा.
ज्या कारणांमुळे गंगेचं पाणी इतर नद्यांच्या तुलनेत जास्त शुद्ध राहतं त्यातल्या काहींवर एक नजर टाकुयात..
# गंगेच्या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन ( dissolved oxygen ) इतर नद्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे...
# गंगा हिमालयात खूप जास्त उंचीवरून आणि अत्यंत कमी तापमानाच्या प्रदेशातून वाहत येते, अत्यंत कमी तापमानामुळे गंगेच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असून ते पाण्याला शुद्ध ठेवते...
# दुसरं प्रमुख कारण म्हणजे गंगेच्या किनाऱ्यावर जे नैसर्गिक वनस्पती आणि झाडे झुडुपे आहेत, ते मोठ्या प्रमाणावर "टरपीन्स" उत्सर्जित करतात आणि तेच टरपीन्स गंगेच्या पाण्याला शुद्ध करण्याचं काम करतात...
# तिसरं महत्वाचं कारण म्हणजे गंगेच्या पाण्यातील "बैक्टेरियोफाज"... जे बैक्टेरियाचा नैसर्गिक शत्रू असून गंगेच्या पाण्याला कोणत्याही बैक्टेरिया पासून मुक्त ठेवून शुद्ध करते...
# गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेचा आणखी एक कारण म्हणजे गंगेच्या पात्रात तळाशी असलेले अत्यंत बारीक दगड, गोटे, कण म्हणजेच sediments... ते ही वाहत्या गंगेच्या पाण्याला एका चाळणीसारखे शुद्ध करण्याचं काम करतात असे नीरीच्या संशोधनात आढळले आहे..























