एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : शिक्षकांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा आदेश रद्द, हायकोर्टाचा तावडेंना दणका
मुंबई हायकोर्टाने राज्य सरकार, शालेय शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दणका दिला आहे. मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबई बँकेत जमा करण्याचा राज्य सरकारचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे.
मुंबई हायकोर्टानं निकाल देताना काही निरीक्षणं नोंदवली आहेत. हायकोर्ट म्हणाले, "विनोद तावडे हे स्वतः 2013 मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनीच मुंबै बँकेत प्रचंड गैरप्रकार आणि गैरव्यवहार होत असल्याचे आरोप केले होते आणि अगदी राज्यपालांपर्यंत पत्र लिहिले होते. मग आता त्यांना शिक्षणमंत्री असताना ही बँक शिक्षकांचे पगार जमा करण्यासाठी योग्य कशी वाटली, हे समजण्यासारखे नाही."
तसेच, "युनियन बँकेत पगार देण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू असताना, त्या धोरणात अचानक बदल करण्याचेही काही तर्कसुसंगत कारण राज्य सरकारने दिलेले नाही. म्हणून राज्य सरकारचा निर्णय फेटाळण्यायोग्य आहे.", असेही हायकोर्टाने नमूद केले.
या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन हायकोर्टाने मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा राज्य सरकारचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द केला आहे.

बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement