Gaja Marne Vastav 134 : गजानन मारणेची दहशत का वाढतली ? कोणकोणत्या नेत्यांचा त्याला पाठिंबा?
Gaja Marne Vastav 134 : गजानन मारणेची दहशत का वाढतली ? कोणकोणत्या नेत्यांचा त्याला पाठिंबा?
पुण्यातील नामचीन गुंड गजानन मारणेला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असुन आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. केंद्रिय नागरी उडड्यन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला कोथरुड भागात मारहाण केल्याबद्दल गजानन मारणेच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आलीय. त्यांच्यासह गजानन मारणे वर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येतेय. गजानन मारणे वर मोका कायद्याअंतर्गत करण्यात आलेली ही चौथी कारवाई आहे. याआधी तीनवेळा मोका कारवाई होऊन देखील गजानन मारणे ची दहशत कमी होण्याएवजी वाढत गेली कारण सर्वपक्षीय राजकारण्यांनी राजकीय फायद्यासाठी गजानन मारणेला दिलेला जाहीर पाठिंबा. नजीकच्या काळात मारलेला कोणकोण राजकिय नेते भेटले? * पार्थ पवार * खासदार निलेश लंके * मंत्री चंद्रकांत पाटील * गजानन मारणे ची बायको जयश्री मारणे या मनसेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या . त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये देखील प्रवेश केला होता. गजानन मारणे वर एकुण २८ गुन्हे नोंद असून त्यातील तीन हत्येचे तर सहा हत्येच्या प्रयत्नांचे आहेत. त्याशीवाय खंडणी, अपहरण , बेकायदा शस्त्र बाळगणे , मारामारी असे इतर गुन्हे आहेत. मकोका कायद्याअंतर्गत झालेली ही चौथी कारवाई आहे























