एक्स्प्लोर
30 वर्षांची मराठी अभिनेत्री ठरली गोविंदा अन् सुनीताच्या सुखी संसारात काटा? 37 वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा लवकरच काडीमोड?
Govinda Sunita Divorce Rumors: बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा यांचा लवकरच घटस्फोट होऊ शकतो.

Govinda Sunita Divorce Rumors
1/10

बॉलिवूडचा नंबर वन हिरो गोविंदा गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब असला तरी, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अजूनही चर्चेत आहे. अशातच आता गोविंदाच्या पर्सनल लाईफबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2/10

मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदाचे एका 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत आणि याच कारणामुळे त्याच्यात आणि पत्नी सुनीतामधले मतभेद वाढले असून प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे.
3/10

सुपरस्टार गोविंदाचं नाव नेहमीच बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या यादीत सामील राहिलं आहे. 80 आणि 90 च्या दशकात गोविंदानं चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. गोविंदाच्या अभिनयासोबतच त्याच्या डान्सवरही त्याचे चाहते घायाळ होते. आजही गोविंदाचे अनेक फॅन्स आहेत.
4/10

पण आता अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेडिटवरील एका पोस्टनुसार, 37 वर्षांच्या सुखी-संसारानंतर गोविंदा आपल्या पत्नीला घटस्फोट देणार आहे.
5/10

यापूर्वी, अभिनेत्याची पत्नी सुनीता हिनंही त्याच्या अफेअरबद्दल संकेत दिले होते. तसेच, दोघांचं शेड्यूल आणि लाईफस्टाईल मॅच होत नसल्यामुळे दोघेही बराच काळ वेगळे राहतात.
6/10

दरम्यान, गोविंदाचे एका मराठी अभिनेत्री सोबत अफेअर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही अभिनेत्री 30 वर्षांची आहे. दोघांच्या वयात सुमारे 31 वर्षांचा फरक आहे. पण अभिनेत्रीचं नाव अद्याप उघड झालेलं नाही.
7/10

गोविंदानं अद्याप या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशा परिस्थितीत हे किती खरं? हे सांगणं थोडं कठीण आहे.
8/10

हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीता म्हणाली होती की, "मी आधी खूप सिक्योर होते. पण आता नाही. कारण 60 वर्षांनंतर लोक म्हातारे होतात. ते काय करतायत, ते मला माहीत नाही."
9/10

गोविंदाने 1987 मध्ये त्याची पत्नी सुनीता हिच्याशी लग्न केलं. दोघेही दोन मुलांचे पालक आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
10/10

दरम्यान, ABP Majha या वृत्ताची पुष्टी करत नाही. आतापर्यंत गोविंदाने स्वतः या अफवांवर प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही याबद्दल बोललेलं नाही.
Published at : 25 Feb 2025 03:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion