BAN vs ZIM:आणखी एक थरारक सामना, झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात बांगलादेशचा तीन धावांनी विजय
BAN vs ZIM, T20 World Cup 2022: ब्रिस्बेनच्या (Brisbane) द गबा (The Gabba) स्टेडियमवर बांगलादेश आणि झिम्बाब्वे (Bangladesh vs Zimbabwe) यांच्यात आज सुपर-12 फेरीतील सामना खेळला गेला.
BAN vs ZIM, T20 World Cup 2022: ब्रिस्बेनच्या (Brisbane) द गबा (The Gabba) स्टेडियमवर बांगलादेश आणि झिम्बाब्वे (Bangladesh vs Zimbabwe) यांच्यात आज सुपर-12 फेरीतील सामना खेळला गेला. या थरारक सामन्यात बांगलादेशच्या संघानं तीन धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 151 धावांचं लक्ष्य ठेवलं. बांगलादेशकडून सलामीला आलेल्या नजमुल हुसेन शांतोनं (Najmul Hossain Shanto) 55 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली.बांग्लादेशच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेचा संघाला 147 धावापर्यंत मजल मारता आली.
ट्वीट-
What a match! 🥵
— ICC (@ICC) October 30, 2022
Bangladesh emerge victorious after a thrilling clash against Zimbabwe!#T20WorldCup | #BANvZIM | 📝https://t.co/Qi8dhfgeEW pic.twitter.com/qayCpqXi0y
बांगलादेशची जबरदस्त गोलंदाजी
दरम्यान, 151 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगवान गोलंदाज तस्किन अहमदनं चार षटकात केवळ 19 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. ज्यात एका मेडन ओव्हरचाही समावेश आहे. याशिवाय मुस्तफिजुर रहमाननं चार षटकात 15 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. तर, मोसाद्दिक हुसेननंही चार षटकात 38 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या.
झिम्बाब्वेच्या संघाची खराब फलंदाजी
बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाव्वेच्या संघाची दमछाक झाल्याचं पाहायला मिळाली. सलामी फलंदाज वेस्ली माधवेरेनं (4 धावा) पहिल्याच षटकात विकेट गमावली. याशिवाय, कर्णधार क्रेग इर्विनही (8 धावा) मोठी खेळ करण्यास अपयशी ठरला.तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिल्टन शुम्बा स्वस्तात माघारी परतला. त्यानं या सामन्यात अवघ्या आठ धावा केल्या. मुस्तफिझूर रहमाननं त्याला आऊट केलं. तर, झिम्बाब्वेचा संघाचा स्टार फलंदाज सिकंदर रझा खातं न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
सीन विल्यम्सची एकाकी झुंज
त्यानंतर रेगिस चकाब्वानंही 19 चेंडूंत 15 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सीन विल्यम्सनं झिम्बाब्वेसाठी विजयाची आशा निर्माण केली. त्यानं अवघ्या 42 चेंडूत 64 धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र, झिम्बाब्वेच्या आठराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो धावबाद झाला. रायन बर्लेने 25 चेंडूत 27 धावांची खेळी केली. मात्र, तोही संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
हे देखील वाचा-