एक्स्प्लोर
Hardik Pandya : टीम इंडियाचा विजयाचा जल्लोष, हार्दिक पांड्याने दाखवली ट्रॉफी
Team India T20 World Cup Celebration : टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरिन ड्राईव्हवर तीन लाखाहून अधिक चाहत्यांच्या गर्दीचा महापूर उसळला आहे.

Team India T20 World Cup Celebration Mumbai
1/9

T20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया भारतात आली असून थोड्याच वेळात ती मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवरील कार्यक्रमासाठी पोहोचणार आहे.
2/9

मुंबई विमानतळावर आल्यानंतर टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडिया नरिमन पॉईंटकडे रवाना झाली.
3/9

नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडिअम अशी टीम इंडियाची ओपन डेकमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
4/9

यासाठी क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) दाखल झाले आहेत.
5/9

आयपीएलवेळी ज्या मैदानावर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीकेचा धनी झाला होता, त्याच पांड्याने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
6/9

यावेळी नरिमन पॉईंटकडे जात असताना हार्दिक पांड्याने एबीपी माझाच्या कॅमेरात विजयाची ट्रॉफी दाखवली.
7/9

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरिन ड्राईव्हवर जवळपास तीन लाखाहून जास्त चाहत्यांचा महापूर उसळला आहे.
8/9

मरिन ड्राईव्हवरून ओपन डेकवरून टीम इंडियाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
9/9

त्यानंतर वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडणार आहे.
Published at : 04 Jul 2024 07:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
