IND vs SA Head To Head Record: टी-20 विश्वचषकात भारत- दक्षिण आफ्रिका आमने-सामने; कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
IND vs SA, T20 World Cup 2022: दोन्ही संघांनी आपापल्या मागील सामन्यांमध्ये मोठे विजय नोंदवले आहेत.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सामना रविवारी (30 ऑक्टोबर) पर्थ स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपापल्या मागील सामन्यांमध्ये मोठे विजय नोंदवले आहेत. भारतीय संघ नेदरलँड्सविरुद्ध 56 धावांनी विजय मिळवत असताना, प्रोटीज संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा 104 धावांनी पराभव केलाय. दरम्यान, भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात कोणाचं पारडं जड आहे? यावर एक नजर टाकुयात.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघानं 13 सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेनं नऊ सामन्यात बाजी मारली आहे. यातील एक सामना अनिर्णित ठरला आहे. सध्याची आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्याची टी-20 मालिकाही जिंकली होती.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर-12 मधील सामना रविवारी 30 ऑक्टोबर रोजी पर्थ क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 4.30 वा. सुरू होईल. तर, अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकतात. तसेच टी-20 विश्वचषकाच्या संबंधित ताज्या बातम्या वाचण्यासाठी तुम्ही एबीपी माझावर वेबसाईटवर भेट देऊ शकतात.
भारतीय संभाव्य प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रीसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी/लुंगी एनगिडी/मार्को जॅनसेन.
हे देखील वाचा-