4 सामन्यात 2 वेळा डक, कार्तिकची बॅट शांतच, IPL 2023 मध्ये खराब प्रदर्शन
Dinesh Karthik : आयपीएलच्या सोळाव्या हंगमात आरसीबीचा फिनिशर दिनेश कार्तिक याची बॅट शांत असल्याचे दिसतेय.

Dinesh Karthik In IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगमात आरसीबीचा फिनिशर दिनेश कार्तिक याची बॅट शांत असल्याचे दिसतेय. आतापर्यंतच्या चार डावात दिनेश कार्तिक याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. कार्तिक आतापर्यंत दोन वेळा गोल्डन डकचा शिकार झालाय. इतर दोन डावातही कार्तिकला मोठी खेळी करता आलेली नाही. यंदाच्या हंगामात आतापर्यंत दिनेश कार्तिकचे प्रदर्शन खराब झाल्याचे दिसतेय. गेल्या हंगमात आरसीबीसाठी कार्तिकने फिनिशरचे काम बजावले होते. पण यंदा कार्तिकला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.
कार्तिकचे IPL 2023 मध्ये खराब प्रदर्शन
गतवर्षीच्या कामगिरीच्या जोरावर कार्तिकने टीम इंडियात पुनरागमन केले होते. पण यंदा कार्तिकला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत आरसीबीच्या चार सामन्यात कार्तिक फ्लॉप गेलाय. यामध्ये तो दोन वेळा गोल्डन डकचा शिकार झालाय. तर दोन सामन्यातही त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरोधात कार्तिकला खातेही उघडता आले नाही. तर अन्य दोन सामन्यात ९ आणि एक धाव करता आली. आयपीएलच्या चार सामन्यात कार्तिकला फक्त दहा धावा काढता आल्यात. कार्तिकचा सध्याचा फॉर्म आणि वय पाहाता पुढील हंगामापूर्वी आरसीबी कार्तिकला रिलिज करु शकते.
गेल्या हंगामात कार्तिकची धमाकेदार कामगिरी -
गेल्या आयपीएल हंगामात कार्तिकने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने फिनिशिंगचा रोल व्यवस्थित पार पाडला होता. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर कार्तिकचे टीम इंडियात पुनरागमन झाले होते. कार्तिकने गेल्या हंगामात 184 च्या स्ट्राईक रेटने 330 धावांचा पाऊस पाडला होता. यावेळी नाबाद 66 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. पण यंदाच्या हंगमात कार्तिक अद्याप फ्लॉप झालाय. त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
आतापर्यंतचे कार्तिकची आयपीएल कामगिरी -
दिनेश कार्तिक याने आतापर्यंत आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. कार्तिकने 233 आयपीएल सामने खेळले आहेत. यामधील 212 डावात कार्तिकने 26.42 च्या सरासरीने आणि 132.43 च्या स्ट्राइक रेटने 4386 धावा केल्या आहेत. यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 97 इतकी राहिली आहे.
Dinesh Karthik in IPL2023 So far
— ` (@kurkureter) April 15, 2023
0(3)
9(8)
1(1)*
0(1)
Those who compare me with Dhoni should be jailed. pic.twitter.com/lowdzlkoTz
आणखी वाचा :
DC vs RCB 1st Innings Highlights: विराट कोहलीचे अर्धशतक, फिरकीच्या जाळ्यात आरसीबी, दिल्लीला विजयासाठी 175 धावांची गरज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
