Video : कसोटी सामन्यात टी-20 शैलीत फटकेबाजी! भारतानंतर ट्रॅव्हिस हेडने लंकेच्या गोलंदाजांना फोडला घाम, 11 चेंडूत ठोकल्या 46 धावा
Sri Lanka vs Australia 1st Test : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅटने कहर केल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आता श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला आहे.
Travis Head Australia tour of Sri Lanka : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅटने कहर केल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आता श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ट्रॅव्हिस हेडने आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. पुन्हा एकदा त्याने कसोटीत टी-20 शैलीत फटकेबाजी केली आणि फक्त 40 चेंडूत 57 धावा केल्या. या वादळी अर्धशतकात हेडने 11 चौकार मारले. पहिल्या कसोटीत हेडने फक्त 35 चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकून श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
हेड ठोकले तुफानी अर्धशतक
घरच्या मैदानावर झालेल्या पाच सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताला दारुण पराभव पत्करल्यानंतर आणि 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तिकीट बुक केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना बुधवार 29 जानेवारी रोजी सुरू झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने उस्मान ख्वाजासोबत ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात केली. यादरम्यान, हेडने फक्त 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
Travis Head leads the Aussie charge! 👊
— FanCode (@FanCode) January 29, 2025
The Southpaw's rapid 57 propelled Australia into the driver's seat in the first session at Galle! 🔥#SLvAUSonFanCode pic.twitter.com/X3pHgQrRxu
10 चौकार आणि 1 षटकार
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडने 57 धावा केल्या. या काळात त्याने चाळीस चेंडूंचा सामना केला. हेडने 57 पैकी 46 धावा चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. या स्फोटक खेळीत ट्रॅव्हिसने 10 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचा स्ट्राईक रेट 142 पेक्षा जास्त होता. प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवर हेड झेलबाद झाला. हेड आणि ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी 14.3 षटकांत 92 धावांची भागीदारी केली.
भारताविरूद्धही हेडने उडवून दिली होती खळबळ
श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यापूर्वी हेडने त्याच्या घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्ध खळबळ उडवून दिली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत ट्रॅव्हिस हेड सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. हेडने पाच सामन्यांमध्ये एकूण 448 धावा केल्या होत्या. या काळात त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाविरुद्ध हेडची फलंदाजीची सरासरी 56 होती. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये त्याने 141 चेंडूत 140 धावा केल्या. याशिवाय, गाब्बा येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने 160 चेंडूत 152 धावांची शानदार खेळी केली होती.
हे ही वाचा -