छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक किती होते? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र याबाबत ठोस अशी माहिती नसली तरी इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती मांडणी केली आहे.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सैन्यात मुस्लिम सैनिक किती होते? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र याबाबत ठोस अशी माहिती नसली तरी इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती मांडली आहे. त्यामुळं त्यांच्यावर चर्चा करणं किंवा वाद घालणं योग्य नाही असं मत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर नितेश राणे यांनी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील शिवेंद्रसिंह राजे यांनी प्रतिक्रिया दिली.
अबू आझमी यांच्यामुळेच वाद वाढला
नितेश राणे यांनी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला हिंदूकडून मटन घ्यायचं तो त्यांच्याकडून घेईल आणि ज्याला मुस्लिमांकडून मटन घ्यायचं तो त्यांच्याकडून घेईल असं शिवेंद्रराजेसिंह भोसले यांनी सांगितले. मात्र हा वाद अबू आझमी यांच्यामुळेच वाढला असल्याचं देखील त्यांनी सांगितल आहे. खरंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपटानंतर अबू आझमी यांनी असं वक्तव्य करायची गरजच नव्हती. राजकारण करायला बरेच विषय आहेत. मात्र, या विषयात राजकारण करणं चुकीचं असल्याचं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?
अबू आझमींनी म्हटलं होतं की, चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेत अबू आझमींच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. यानंतर आता अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत. मी कोणत्याही महापुरुषाबद्दल कोणतही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. आम्ही जे काही भाषणं ऐकतो, त्यावरुन मी वक्तव्य केले. यावर वाद तयार करण्याची काय गरज आहे? भाजपचा ज्या मुद्द्यांवरून मतं मिळतात त्याच मुद्द्यांवर वाद निर्माण केले जातात. महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा द्या, तसा कायदा करा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे या आधीच केली आहे. ज्याची सत्ता असते तो कसाही गुन्हा दाखल करु शकतो. आज त्यांची सत्ता आहे, त्यांनी खुशाल आपल्याला तुरुंगात घालावे. जे इतिहासात सत्य आहे ते बदलता येणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:


















