एक्स्प्लोर
तळकोकणातील समुद्रकिनारी चकाकणारी निळ्याशार रंगाची चादर
1/5

'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' हा जीव सागरी परिसंस्थेला घातक असल्याचे सागरी अभ्यासक सांगतात. हे जीव मोठ्या संख्येने किनारपट्टीक्षेत्रात येत असल्याने ते माशांचे अन्न असणाऱ्या 'फायटोप्लॅन्कटन्स' आणि 'डिऍटॉम्स' मोठ्या प्रमाणात खातात. त्यामुळे अन्नाच्या अभावी त्या क्षेत्रात माशांची संख्या कमी होत असल्याची माहिती सागरी जीवशास्त्रज्ञ स्वप्निल तांडेल यांनी दिली. शिवाय हे जीव मृत पावल्यानंतर अमोनिया निर्माण होऊन पाणी आम्लयुक्त होते. या आम्लयुक्त पाण्यामुळे माशांचाही मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. (फोटो : प्रतिक जाधव)
2/5

समुद्राच्या लाटा एकमेकांवर घर्षण झाल्यामुळे या जीवांना धोका निर्माण झाल्यासारखे वाटते. त्यामुळे ते निळा प्रकाश उत्सर्जित करत असल्याने लाटांवर निळा प्रकाश पसरवतात. परिणामी समुद्राकिनारी चकाकणारी निळ्याशार रंगाची चादर पसरल्याचं चित्र दिसत आहे. (फोटो : प्रतिक जाधव)
Published at :
आणखी पाहा























