एक्स्प्लोर
Kurla Building Collapse: कुर्ल्यात दुमजली घर पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं! गल्लीत उभे असणारे ढिगाऱ्याखाली गाडले, CCTV व्हिडिओ व्हायरल
Kurla Building Collapse: कुर्ला येथील कुर्ला गाव पीटर परेरा रोडवर ही घटना घडली आहे. सदर विद्यार्थिनी तिच्या आजीसोबत क्लासला जाण्यास निघाली होती.

Kurla Building Collapse
1/6

कुर्ल्यात एक निर्माणाधीन दुमजली घर अंगावर कोसळून 12 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अनिशा रामचंद्र इपिली असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
2/6

कुर्ला येथील कुर्ला गाव पीटर परेरा रोडवर ही घटना घडली आहे. सदर विद्यार्थिनी तिच्या आजीसोबत क्लासला जाण्यास निघाली होती.
3/6

या वेळी त्या दोघी रस्त्यावरील वंदना ठक्कर यांच्या ८३ क्रमांकाच्या घराजवळ आल्या असता या घराच्या डागडुजीचे काम सुरू होते, तो वरील मजलाच त्यांच्या अंगावर कोसळला.
4/6

या घटनेमध्ये अनिशा गंभीर जखमी झाली, तिला स्थानिकांनी क्रीटीकेयर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिची स्थिती नाजूक आहे.
5/6

ही घटना या रस्त्यावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात घरमालक वंदना मथुरादास ठक्कर आणि कंत्राटदार ऑस्टिन न्यूनिस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6/6

अनिशाच्या कुटुंबाची स्थिती प्रचंड हलाखीची असल्याने आणि त्यात अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे
Published at : 21 Feb 2025 02:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
