Chhaava Box Office Collection Day 12: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं चक्रीवादळ; 400 कोटींच्या क्लबपासून फक्त काही पावलं दूर, एकूण कमाई किती?
Chhaava Box Office Collection Day 12: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं 350 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 12 व्या दिवशी 400 कोटी क्लबमध्ये सामील होण्यापासून हा चित्रपट किती दूर आहे?

Chhaava Box Office Collection Day 12: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) 14 फेब्रुवारी रोजी देशभरात रिलीज करण्यात आला. तेव्हापासून, आतापर्यंत चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) तब्बल 12 दिवस पूर्ण केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) थोरले सुपुत्र आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची गौरवशाली कहाणी रुपेरी पडद्यावर दाखवणारा 'छावा' सारखा चित्रपट कित्येक वर्षांनी आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
'छावा' चित्रपटानं 31 कोटी रुपयांची दमदार ओपनिंग केली. तेव्हापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरचा लंबी रेस का घोडा ठरणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई केली. चित्रपटानं अवघ्या काही दिवसांतच 100 ते 200 आणि नंतर 200 ते 300 कोटींचा टप्पा अगदी सहज ओलांडला. अशातच आता 'छावा' चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. आज चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
'छावा'चं आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
बॉक्स ऑफिस कलेक्शनचा डेटा ठेवणाऱ्या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, आजचा म्हणजेच, 12 व्या दिवसाचा डेटा खालील तक्त्यात दिला आहे. यामधील पहिल्या 11 दिवसांचा डेटा निर्मात्यांनी दिलेल्या डेटानुसार आहे. त्यानुसार चित्रपटानं 11 दिवसांत 353.61 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अशातच बाराव्या दिवसाचा कमाईचा डेटा आणि एकूण कलेक्शन सकाळी 10:50 पर्यंतचा आहे आणि हे अंतिम आकडे नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात...
| दिवस | कमाई (कोटींमध्ये...) |
| पहिला दिवस | 33.1 |
| दुसरा दिवस | 39.3 |
| तिसरा दिवस | 49.03 |
| चौथा दिवस | 24.1 |
| पांचवा दिवस | 25.75 |
| सहावा दिवस | 32.4 |
| सातवा दिवस | 21.60 |
| आठवा दिवस | 24.03 |
| नववा दिवस | 44.10 |
| दहावा दिवस | 41.1 |
| अकरावा दिवस | 19.10 |
| बारावा दिवस | 17 |
| एकूण | 370.61 |
400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार 'छावा'
'छावा' चित्रपटाच्या बाराव्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर असं दिसतं की, हा चित्रपट लवकरच 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. असं होण्यासाठी 2-3 दिवस कदाचित वाट पाहावी लागेल.
View this post on Instagram
दरम्यान, 'छावा'मध्ये विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे आणि त्याचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. पुष्पा 2 मधील अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना सारख्या कलाकारांनीही चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह हे देखील 'छावा'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























