Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपदाचा तिडा एक-दोन दिवसांत सुटण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking News LIVE Updates: मस्साजोग वासीयांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आज खासदार बजरंग सोनवणे धनंजय देशमुख यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांची बैठक आहे. ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत. मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवू असं पोलिसांचं पत्र आलं असलं, तरी प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तर रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपदाचा तिडा एक-दोन दिवसांत सुटण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...
एबीपी माझाच्या महापालिकेचे मुद्दे कार्यक्रमाचा इम्पॅक्ट, बेवारस वाहनांवर वाहतूक पोलिसांनी केली कारवाई
कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांच्या शेजारी बेवारस वाहन वर्षानुवर्ष धुळखात पडलेली आहेत... अशा वाहनांवर कोल्हापूर पोलीस दल वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे... कोल्हापूर शहरात मुख्य रस्त्यांच्या बाजूला गेली अनेक वर्ष बेवारस पद्धतीने वाहने लावून वाहनांचे मालक गायब आहेत... या वाहनांमुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत... बेवारस पद्धतीने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या या वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सकाळपासून वाहतूक पोलिसांनी दसरा चौक ते स्टेशन रोड वरील मुख्य रस्त्यावर बेवारस वाहने जप्त करण्यास सुरुवात केलेली आहे...
अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची आईला मारहाण, लोणावळ्यात गुन्हा दाखल
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या आईला बेदम मारहाण केलीये. आईच्या पाठीवर, हातावर, मानेवर व्रण ही उमटलेत. मारहाण करणाऱ्या पोराचं मारुती देशमुख असं नाव असून नुकतीच त्यांची मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीये. कार्ला येथील आई एकविरा देवी ट्रस्टचं विश्वस्त पद ही त्यांच्याकडे आहे. दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी राहत्या घरातच आईला मारहाण केली. आई सावित्रीबाई या सात-आठ महिन्यांपूर्वी मारुती आणि दुसरा मुलगा विलास देशमुखांकडे राहायला आल्या, त्याआधी त्या पुण्यात राहणारा लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांच्याकडे राहत होते. मात्र आता मूळगावी देवघर या ठिकाणी जायचा हट्ट धरला अन त्या तिथं राहायला आल्या. मात्र स्वतःची आई आपल्याकडे राहायला आली हे मारुती देशमुख आणि कुटुंबियांना काय पचनी पडलं नाही. मग त्या इथून परत पुण्यात लहान भावाकडे जावी, म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. असा आरोप लहान मुलगा राजेंद्र यांनी केलाय. यातूनच दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी आईला बेदम मारहाण केली. याप्रकरणी आईने लोणावळा ग्रामीण पोलिसांत मुलगा मारुती, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात केलाय. अजित पवार सत्तेत असल्याचा गैरफायदा त्यांचे समर्थक घेत असल्याचं समोर येत असताना त्यात या आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. माझ्या पक्षातील कोणी कायदा हातात घेतला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करा, असा आदेश अजित पवारांनी आधीच दिलाय. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलाय, पण तो अदखलपात्र गुन्हा आहे. मुळात ज्या आईने जन्म दिला, तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या मारुती देशमुखांना बेड्या ठोकण्याची अन अजित पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची गरज आहे. मात्र पोलीस आणि अजित दादा ही पावलं उचलणार का? हा खरा प्रश्न आहे.






















