एक्स्प्लोर
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: नरेंद्र मोदींच्या उजव्या हाताला फडणवीस, डाव्या बाजूला शरद पवार; राजधानी दिल्लीत गर्जा महाराष्ट्र, पाहा फोटो
दिल्लीत येथे आज 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडत आहे. यावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उजव्या हाताला देवेंद्र फडणवीस तर डाव्या बाजूला शरद पवार बसल्याचे दिसून आले.
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Inauguration today
1/7

देशाची राजधानी दिल्लीत आज (21 फेब्रुवारी 2025) 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Inauguration) पार पडत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीच्या विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पार पडत आहे.
2/7

तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) दिल्लीत होत आहे. शरद पवार (Sharad Pawar) या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर मुख्यमंत्री (CM Devendra Fadnvis) प्रमुख पाहुणे आहेत. डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhavalkar) या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत.
3/7

यावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उजव्या हाताला देवेंद्र फडणवीस तर डाव्या बाजूला शरद पवार बसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केल्यावर आणि संजय राऊत यांनी केलेल्या जोरदार टीकेनंतर पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर एकत्र आले आहेत.
4/7

यावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचे ही बघायला मिळाले आहे.
5/7

अशातच या कार्यक्रमात दीपप्रज्वलना वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा हात पकडून पूजन केल्याचे ही बघायला मिळाले आहे. तर दुसरीकडे मोदींनी स्वत: पवारांसाठी पाण्याचा ग्लास भरल्याचे ही चित्र बघायला मिळाले आहे.
6/7

21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान विविध साहित्यिक कार्यक्रम या संमेलनात होतील. संमेलनासाठी दोन कोटींचा अतिरिक्त निधी राज्य सरकारने मंजूर केलाय. साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दरवर्षी दोन कोटींचं अर्थसहाय्य करतं. मात्र दिल्लीतील खर्च लक्षात घेऊन अधिक निधीची महामंडळाची मागणी पूर्ण करण्यात आली आहे.
7/7

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत आणि आशीष शेलार, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित संमेलनात उपस्थिती नोंदविणार आहेत.
Published at : 21 Feb 2025 05:57 PM (IST)
आणखी पाहा























