एक्स्प्लोर
Nashik Accident : लोखंडी वस्तू भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक, सळ्या तरुणांच्या शरीरातून आरपार; नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 8 वर
Nashik Accident : नाशिक अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आयशर ट्रक आणि मालवाहतूक ट्रकची धडक होऊन हा अपघात घडला.

Nashik Accident Dwarka Flyover Horrific Incident
1/10

नाशिक मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. इतर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते, त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
2/10

नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर आयशर ट्रक आणि मालवाहतूक टेम्पोमध्ये चाललेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.
3/10

नाशिक शहरातील सिडको येथील 20 ते 25 रहिवाशी निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.
4/10

धार्मिक कार्यक्रम आटवून घरी परत असताना या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात घडला.
5/10

रविवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. यावेळी स्थानिकांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केलं.
6/10

या अपघातात जागीच पाच जण ठार झाले असून, रुग्णालयात उपचारादरम्यान इतर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे.
7/10

याशिवाय, अपघातातील इतर तेरा जण गंभीर जखमी असल्याची देखील माहिती समोर येत आहे. या सगळ्या जखमींवर नाशिक जिल्हा रुग्णालय आणि नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
8/10

धुळ्याहून लोखंडी सळ्या घेऊन जाणारा आयशर ट्रक जात होता आणि या ट्रकच्या मागच्या बाजूने या भाविकांच्या वाहनाने जोरदार धडक दिली.
9/10

हा अपघात अतिशय भीषण होता. या अपघाताची तीव्रता फोटोमधून स्पष्ट पाहायला मिळत आहे.
10/10

अपघात स्थळाची पाहाणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन थोडयाच वेळात पोहचणार आहेत. यानंतर ते रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमींचीही भेट घेणार आहेत.
Published at : 13 Jan 2025 09:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
नाशिक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
