एक्स्प्लोर
Santosh Deshmukh Case Krushna Andhale : तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? CCTV फुटेज समोर, पाहा PHOTOS
Santosh Deshmukh Case Krushna Andhale : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा नागरिकांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Santosh Deshmukh Case Krushna Andhale
1/10

बीड येथील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अजूनही फरार आहे.
2/10

फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
3/10

गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
4/10

कृष्णा आंधळेने तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता, असे वर्णन सुद्धा स्थानिकांनी केले आहे.
5/10

नागरिकांनी हटकल्यानंतर मोटारसायकल वरून तो पळून गेल्याची माहिती देखील स्थानिकांनी दिली आहे.
6/10

मी बघितलेली व्यक्ती कृष्णा आंधळेच होता. तो आता मखमलाबादच्या दिशेने गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
7/10

पोलीस या प्रकरणाची खातरजमा करत आहेत.
8/10

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.
9/10

हे सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती आले आहे.
10/10

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा कृष्णा आंधळेच आहे का? याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही. नाशिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Published at : 12 Mar 2025 01:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















