एक्स्प्लोर
Manikrao kokate: माणिकराव कोकाटेंना 28 वर्षांनी ते 'पाप' फेडावं लागलं, एक नव्हे तर चार घरं लाटली
Manikrao kokate: राज्याचे कृषीमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांना मोठा झटका बसला आहे. माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जामीन मिळणार का?

Manikrao kokate sentenced 2 years jail
1/10

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना न्यायालयाने (Court) मोठा दणका दिलाय. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik Court) 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
2/10

नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
3/10

माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांनी मुख्यमंत्री निधीतील फ्लॅट, कमी उत्पन्न आहेत असं सांगून आणि घर आमच्याकडे नाही, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले होते.
4/10

माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री निधीत इतर दोन व्यक्तींना मिळालेली घरेही स्वत:च लाटली होती. याप्रकरणात एकूण सहा साक्षीदारांची तपासणी झाली. त्यानंतर 28 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.
5/10

माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा. या प्रकरणात एकूण चार जण होते. त्यातील माणिकराव कोकाटे आणि भावाला शिक्षा सुनावण्यात आली आहे
6/10

1995 ते 97 काळात सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर होता. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता नाशिक जिल्हा न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरु होती. या प्रकरणाचा निकाल आज न्यायालयाने जाहीर केला.
7/10

भादवी 420, 465, 471,47 अन्वये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल झाला होता.
8/10

अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ भास्कर पाटील सरकार वाडा पोलिस स्टेशन तक्रार केली होती. दिघोळे मनोहर जोशींच्या सरकारमध्ये अपक्ष निवडून आले होते. 1997 माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी आवाज उठवला होता.
9/10

हे 30 वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. त्यावेळी तुकाराम दिघोळे माझे राजकीय वैरी होते. याच राजकीय वैरामधून माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
10/10

जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
Published at : 20 Feb 2025 02:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रीडा
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion