एक्स्प्लोर
Pankaja Munde: पंकजा मुंडेंची बार्शीत 'जोरदार एन्ट्री', समर्थकांनी केले 'जंगी स्वागत'; पाहा फोटो
Pankaja Munde Shiv Shakti Parikrama Tour : दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रीय झाल्या आहेत.

Pankaja Munde
1/10

पंकजा मुंडे यांच्याकडून राज्यभरात देव दर्शन दौरा केला जात असून, या दौऱ्याला त्यांनी 'शिवशक्ती परिक्रमा' दौरा असे नाव दिले आहे.
2/10

पंकजा मुंडे यांच्या 'शिवशक्ती परिक्रमा' दौऱ्याचा आजचा सहावा दिवस असून, त्यांच्या आजच्या दौऱ्याची सुरवात उस्मानाबाद जिल्ह्यातून झाली आहे.
3/10

तर भाजपचे धाराशीव-कळंब विधानसभा निवडणूक प्रमुख दत्ता कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी भेट दिली, आणि त्यानंतर त्यांनी पुढील प्रवासास सुरुवात केली.
4/10

सकाळी धाराशीव येथून बार्शी तालुक्यात प्रवेश करताच नारेवाडी येथे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले.
5/10

दरम्यान, बार्शी शहरात आमदार राजेंद्र राऊत आणि प्रचंड संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी शिव-शक्ती परिक्रमेचं मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत स्वागत केलं.
6/10

या भागाने लोकनेते मुंडे साहेबांइतकंच माझेवरही प्रेम केलं आहे. मी ईश्वराकडे एकच प्रार्थना करते की, ही जनतेची सेवा आणि शक्ती वाढविण्याकडे समर्पित भावनेनं काम करण्याची शक्ती दे, असे पंकजा मुंडे म्हणाल्यात.
7/10

बार्शी येथे पंकजा मुंडे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली.
8/10

यावेळी पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी भल्ला मोठा असा हार तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे या हारसाठी दोन जेसीबीची मदत घेण्यात आली.
9/10

यावेळी अनेक महिला कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच त्यांच्याकडून पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आले.
10/10

दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांनी केलेल्या जंगी स्वागताबद्दल आभार देखील मानले.
Published at : 09 Sep 2023 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
