Surya Grahan 2025 : सूर्यग्रहणामुळे जुळून आला दुर्लभ संयोग; अवघ्या काही तासांतच 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, सुरुवात आत्तापासूनच
Surya Grahan 2025 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असल्यामुळे हे फार खास असणार आहे. कारण आजच्या दिवशी सूर्याचा मीन राशीत प्रवेश होणार आहे.

Surya Grahan 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच (29 मार्च) रोजी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan) लागणार आहे. हे एक आंशिक सूर्यग्रहण असणार आहे. त्यामुळे भारतात हे ग्रहण दिसणार नाही. मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा सर्व 12 राशींसह देशभरात परिणाम होणार आहे.
वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असल्यामुळे हे फार खास असणार आहे. कारण आजच्या दिवशी सूर्याचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. तसेच, या ठिकाणी सूर्यासह शुक्र, राहु, बुध ग्रहासह चंद्र देखील याचा राशीत विराजमान होणार आहे. यामुळे पंचग्रही योग निर्माण होतोय. या दरम्यान काही राशींच्या लोकांसाठी हा काळ फार भाग्यशाली ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहणाचा काळ फार शुभकारक असणार आहे. या राशीच्या धनाच्या चरणात शनीदेव संक्रमण करणार आहे. या ठिकाणी सूर्य, बुध आणि शुक्र, राहू ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे हा काळ फार शुभकारक ठरेल. या काळात तुमच्या जीवनात हळुहळू सकारात्मक बद होताना दिसतील. भावा-बहिणीतील संबंध दृढ होतील. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. जोडीदाराबरोबर चांगला व्यवहार कराल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी सूर्यग्रहणाचा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात सुरु असलेले वाद लवकरच संपतील. तसंच, तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभ असणरा आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात ग्रहांच्या स्थितीत झालेल्या बदलामुळे तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. तसेच, या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण झालेले दिसेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. परदेशात जाण्याची संधी लवकरच चालून येईल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:













