एक्स्प्लोर
पुन्हा एक भीषण अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीला धडकली; अंगावर काटा आणणारे Photo's
Mysuru-Darbhanga Express Accident: देशात रेल्वे अपघात होण्याच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीयेत.

Mysuru-Darbhanga Express Accident
1/9

देशात रेल्वे अपघात होण्याच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीयेत. सातत्याने रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत आहेत.
2/9

अशातच तामिळनाडूमध्ये शुक्रवारी (11 ऑक्टोबर) रात्री उशिरा एक मोठा रेल्वे अपघात झाला.
3/9

म्हैसूर दरभंगा बागमती एक्स्प्रेस ट्रेन (12578) म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी चेन्नईजवळील कावरप्पेट्टाई रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीला धडकली.
4/9

सदर अपघातामुळे जवळपास 12 ते 13 रेल्वे डब्बे रुळावरुन खाली घसरले.
5/9

अपघात झाल्यानंतर दोन ते तीन रेल्वे डब्यांना आग लागली.
6/9

या अपघातात आतापर्यंत 19 जण जखमी झाले आहेत.
7/9

एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या धडकेत सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे.
8/9

चेन्नई विभागातील पोनेरी कावरप्पेट्टाई रेल्वे स्थानकांवर सध्या (चेन्नईपासून 46 किमी) दुरुस्तीचे काम सुरू आहे.
9/9

22 डब्यांच्या या ट्रेनमध्ये स्लिपर क्लासचे 6 डबे, थर्ड एसीचे डबे, सेकंड एसीचे 2 डबे, इकॉनॉमिक क्लासचा 1 डबा आणि जनरल क्लासचे 3 डबे सोबत पॅन्ट्री कार आणि पॉवर कार होती.
Published at : 12 Oct 2024 09:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
