एक्स्प्लोर
रजनीकांतपेक्षा जास्त संपत्ती; कपिल शर्मापेक्षा 66 टक्के अधिक नेटवर्थ, भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन!
Indias richest comedian : भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियनचं 'लेक्चरर' म्हणूनही काम, रजनीकांतपेक्षा जास्त संपत्ती; कपिल शर्मापेक्षा 66 टक्के अधिक नेटवर्थ
Indias richest comedian
1/10

नव्वदीच्या दशकात बॉलिवूडमध्ये जॉनी लिव्हर याचं नाव चर्चेत असायचं. सध्याच्या कॉमेडियन म्हणून कपिल शर्माने मोठं यश मिळवलंय. बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला कॉमेडियन म्हणून कपिलचं नाव चर्चेत असतं.
2/10

सध्या कपिल शर्मा भारतातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन आहे. शो, स्टेज परफॉर्मन्स आणि अनेक सिनेमांमध्ये कपिलने काम केलंय. त्यानंतर त्याला मोठी प्रसिद्धी देखील मिळाली. अनेक लोक असा विचार करत असतील की, कॉमेडियन कपिल शर्मा सर्वात श्रीमंत आहे. मात्र, तसं नाही. एक दाक्षिणात्य कॉमेडी किंग भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन आहे.
3/10

टॉलिवूडमध्ये 'किंग ऑफ कॉमेडी' म्हणून प्रसिद्ध असलेला तेलगू अभिनेता ब्रह्मानंदम भारतातील सर्वात श्रीमंत ब्रह्मानंदम आहे.
4/10

डीएनए आणि मनीकंट्रोलच्या माहितीनुसार, ब्रह्मानंदम यांनी त्यांच्या करियरमध्ये 1 हजार पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 60 मिलियन डॉलर इतकी आहे.
5/10

भारतीय चलनानुसार ब्रह्मानंदम यांची संपत्ती 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. संपत्तीच्या बाबतीत ब्रह्मानंदम यांनी रणबीर कपूर, प्रभास आणि रजनीकांतला देखील मागे टाकले आहे. रणबीर कपूरची संपत्ती 350 कोटी आहे, प्रभासची 300 कोटी तर रजनीकांत यांची संपत्ती 400 कोटी रुपये आहे.
6/10

भारतातील अनेक विनोदी कलाकारांपैकी कोणीही संपत्तीच्या ब्रह्मानंदमच्या जवळ जाऊ शकला नाही. कपिल शर्माची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये आहे, तर भारतातील इतर विनोदी कलाकारांची एकूण संपत्ती 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही.
7/10

ब्रह्मानंदम सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी लेक्चरर म्हणून काम करायचे. प्राध्यापक म्हणून काम करत असताना 80 च्या दशकात त्यांनी थेअटर कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
8/10

यानंतर त्यांनी 1985 मध्ये टीव्ही आणि 1987 मध्ये फिल्मी दुनियेत प्रवेश केला. 'अहा ना पेलांता!' यशस्वी झाला आणि त्याला अनेक ऑफर्स मिळू लागल्या.
9/10

90 च्या दशकात, ब्रह्मानंदम प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या तेलगू चित्रपटात होते. कारण त्यांच्या अभिनयाची भूरळ सर्व निर्मात्यांवर पडली होती.
10/10

2012 मध्ये, त्याला सर्वात जास्त स्क्रीन क्रेडिट्ससाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित केले. 2020 पर्यंत, प्रेम नझीरला मागे टाकून त्याच्याकडे सर्वाधिक चित्रपट करण्याचा विक्रम आहे.
Published at : 27 Mar 2025 02:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























