Ishan Kishan : इशान किशनने हसत हसत पाकिस्तानी कर्णधाराची इज्जत काढली
Ishan Kishan Video : सध्या इशान किशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अंपायर अनिल चौधरी (Anil Chaudhary) यांचा एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनिल चौधरी यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला

Ishan Kishan Anil Chaudhary Funny Video : टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू आणि IPL मधील सनरायजर्स हैदराबादचा शतकवीर इशान किशन सध्या त्याच्या फलंदाजीच्या शैलीमुळे चांगलाच चर्चेत आहे. इशान किशनने हिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद 106 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशान किशनला हैदराबादने आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. सध्या इशान किशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अंपायर अनिल चौधरी यांचा एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनिल चौधरी यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून, त्यामध्ये दोघांमधील संवाद प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
इशान किशनची पाक कर्णधारावर टोलेबाजी
इशान किशनने IPL 2025 मधील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद 106 धावांची दणकेबाज खेळी केली होती. या व्हिडिओमध्ये अनिल चौधरी यांनी किशनचे कौतुक करत त्याला एक मजेशीर प्रश्न विचारला, "पूर्वी तू विकेटकीपिंग करताना वारंवार अपील करायचास, पण आता तुला शांत पाहतोय. हा बदल कसा आला?"
यावर इशानने हसत उत्तर दिले, "आता अंपायर लोक खूप स्मार्ट झाले आहेत. जर वारंवार अपील करत राहिलो, तर कधी कधी फलंदाज क्लीन आऊट असून सुद्धा नॉट-आऊट दिला जातो. त्यामुळे योग्य वेळीच अपील करणे फायदेशीर ठरतं. नाहीतर जर मी पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानसारखं सतत अपील करू लागलो, तर तुम्ही एकदाही आऊट द्यायचे नाही!"
View this post on Instagram
इशान किशनचा जबरदस्त फॉर्म
सध्या इशान किशन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने 11 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 106 धावा फटकावल्या. यापूर्वी SRH संघाच्या इंट्रा-स्क्वाड सामन्यातही आक्रमक फलंदाजी करत गोलंदाजांची धुलाई केली होती.
इशान किशन IPL करिअरमध्ये 3,000 धावांचा टप्पा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्याला केवळ 250 धावांची गरज आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि आगामी सामन्यांमध्ये तो आणखी कोणते विक्रम प्रस्थापित करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या





















