Atul Parchure: अतुल परचुरेंसाठी उघडलं स्वर्गाचं दार! 'तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येतेय, 'झी मराठी'च्या सोहळ्यात कलाकारांचे डोळे पाणावले
झालास का रे सेटल इथे.. अंड्याला सांगा आतातरी स्वत:चे किस्से सांग, अतूल परचुरेंच्या आठवणीत कलाकारांचे डोळे पाणावले, झी मराठीच्या पुरस्कारसोहळ्यात कलाकारांची अनोखी मानवंदना

Atul Parchure Zee Gaurav 2025: एखादा सच्चा कलाकार जग सोडून जातो तेंव्हा त्याच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण होते पण आपल्या कामातून तो कलाकार कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतो. हे अतुल परचुरेंच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होणारं वाक्य. आपल्या जाण्यानं मराठी नाट्यसृष्टी अन् चित्रपट, टेलिव्हिजनसृष्टीतल्या आपल्या मित्रांच्या मनाला चटका लावून जाणारा जवळचा मित्र गेल्याची भावना आजही कायम आहे. पण आता दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांच्या आठवणीत झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात स्वर्गाचं दार उघडणार आहे. आणि अतुल परचुरे पुन्हा आपल्यासमोर अवतरणार आहे. कलाकारांनी अतूल परचुरेंना अनोखी मानवंदना दिलीय. झालास का रे सेटल इथे..कधी कधी खाली जाऊन विचारावासं वाटतं मोन्या,कसा आहेस रे ...तुझी खूप आठवण येते यार...अंड्याला सांगा कोणीतरी आतातरी स्वतचे किस्से सांग..तुम्ही सगळे जमता ना पार्क क्लबमध्ये तिथे असतो मी गप्पा ऐकतो..भेटा रे भेटत राहा असं म्हणत अतुल परचुरेंच्या आठवणीत उपस्थित कलाकारांना अश्रू अनावर झाले होते. (Atul Parchure)
झी मराठीवर गुढीपाडव्याला रंगणाऱ्या झी गौरव सोहळ्यात अतूल परचुरेंच्या स्मरणार्थ त्यांच्या जवळच्या मित्र कलाकारांनी अतूल परचुरेंची आठवण काढत त्यांना मानवंदना दिली. स्वर्गाचे दार उघडणार..स्वर्गीय अतुल परचुरे पुन्हा आपल्यात अवतरणार! असं लिहित झी मराठीनं या कार्यक्रमाचा एक छोटा व्हिडिओ प्रेक्षकांसोबत शेअर केला.
View this post on Instagram
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रांत आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण इंडस्ट्री हळहळली. त्यांच्या जाण्याने मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीत निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणी शेअर करत अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली. आता ‘झी नाट्य गौरव पुरस्कार 2025’ मध्येही त्यांना एक खास आदरांजली अर्पण केली जाणार आहे. झी मराठीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या भावनिक श्रद्धांजलीत अतुल परचुरेंच्या अभिनय कारकिर्दीतील काही खास क्षण उलगडले जाणार आहेत. त्यांच्या योगदानाला सलाम करत संपूर्ण मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत त्यांची आठवण कायम राहणार आहे.
हेही वाचा:
दिग्गज कलाकारांचा धमाकेदार परफॉर्मन्स, उत्साहात रंगणार झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा























