मार्कस स्टॉयनिसचा फ्लॅट सिक्सर, बॉल रॉकेटच्या स्पीडने बाऊंड्रीबाहेर गेला अन् महिला पोलिसाला लागला अन्...
IPL 2025 : मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर मार्कस स्टोयनिसचा फ्लॅट षटकार, महिला पोलीस जखमी

IPL 2025 GT vs PBKS : आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात अनेक खेळाडू फटकेबाजी करताना दिसत आहेत. पंजाब किंग्जने त्यांच्या या हंगामातील पहिल्याच सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने गुजरातच्या संघावर 11 धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबने 243 धावांचा डोंगर उभा केला. पंजाब किंग्जने दिलेल्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 232 धावा करता आल्या. (Marcus Stoinis shot hit lady police)
— kuchnahi123@12345678 (@kuchnahi1269083) March 25, 2025
पंजाबचा गुजरातवर 11 धावांनी विजय
प्रियांश आर्या, श्रेयश अय्यर आणि शशांक सिंह यांनी गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. अय्यरने 97 धावा केल्या तर शशांक सिंहने शेवटच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी केली. दरम्यान, या सामन्यात मार्कस स्टॉयनिसने लगावलेला षटकार चर्चेचा विषय बनलाय. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर मार्कस स्टॉयनिस फ्लॅट षटकार मारला आणि तो महिला पोलिसाला जाऊन लागलाय. (Marcus Stoinis shot hit lady police)
मोहम्मद सिराजने लगावलेला षटकार महिला पोलिसाला लागला
या सामन्यात पंजाब किंग्जने चांगली सुरुवात केली नव्हती. प्रभसिमरनने सुरुवातीलाच विकेट गमावली होती. मात्र, त्यानंतर श्रेयस अय्यरने पंजाबचा डाव सांभाळला. पंजाब किंग्जचा संघ एकापोठोपाठ विकेट गमावत राहिला. ग्लेन मॅक्सवेल तर आयपीएलच्या इतिहासात 19 व्यांदा शून्यावर बाद झाला. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मार्कस स्टोयनिस फलंदाजीला आला. त्याने मैदानावर येताच चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, मोहम्मद सिराज 15 वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिसने जोरदार फ्लॅट षककार लगावला आणि तो मैदानाच्या बाहेर जाऊन महिला पोलिसाला लागलाय.
मार्कस स्टॉइनिसने मारलेला षटकार महिला सुरक्षा रक्षकाच्या पायाला लागल्याने सुरुवातीला सगळेच घाबरले. सुरुवातीला सगळे घाबरले. मात्र, काही वेळानंतर पहिला सुरक्षारक्षक व्यवस्थितरित्या पुढे जाताना दिसली. (Marcus Stoinis shot hit lady police)
मार्कस स्टॉयनिसने 2 षटकार आणि 1 चौकार लगावला
मार्कस स्टॉयनिसने या सामन्यात 15 चेंडूमध्ये 20 धावा केल्या. मात्र, तो जास्त वेळ क्रीजवर टीकू शकला नाही. त्याने 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. मात्र, फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. मात्र, तो बाद झाल्याने पंजाब किंग्जचं मोठं नुकसान झालं नाही. कारण शशांक सिंहने पंजाबला चांगल्या स्थितीत पोहोचवले.
— kuchnahi123@12345678 (@kuchnahi1269083) March 25, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या




















